पुणे : आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी... अशी अवस्था दोन दिवसांपूर्वीच जन्मलेल्या दोन बाळांची झाली आहे. ही तान्हुली बाळं मंगळवारी पहाटे पाषाण येथील एका कचºयामध्ये आढळून आली. पाळीव श्वानांनी सकाळी या बाळांचा आवाज ऐकून त्याभोवती संरक्षणाचे कडेच केले होते.
पाषाण येथील तलावालगत टाकलेल्या कचºयाभोवती काही पाळीव श्वान होते आणि बाळांच्या रडण्याचा आवाज येत होता. हा आवाज तिथून जाणाºया शहनवाज शेख यांच्या कानी पडला. त्यांनी कामगारांच्या मदतीने त्या दोन बाळांना कचºयातून उचलले. त्यांना चांगल्या कापडांत गुंडाळले. तेथील महिलांनी त्यांना दूध पाजले. त्यानंतर ही बाळं रडायची थांबली आणि झोपून गेली.
१०८ या रूग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रूग्णालयात नेले. त्यांची तब्येत आता चांगली आहे. केवळ मुलगी आहे असेही नाही. दोन बाळांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ही जुळी बालके आहेत का, या विषयी माहिती मिळाली नाही. दोन्ही तान्हुले एक किंवा दोन दिवसांची असण्याची शक्यता आहे. दोघांची नाळही वाळलेली नव्हती. नाळेला लावलेला चिमटाही तसाच होता. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी टाकून दिलेल्या अर्भकाचे रानटी कुत्र्यांनी लचके तोडले होते. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता.पाळीव श्वानांमुळे बाळांचे वाचले जीवमाणसांमधील माणुसकी आटत असताना दुसरीकडे मात्र पाळीव श्वानांमुळे या बाळांना जणू काही जीवदानच दिले. दोन-तीन पाळीव श्वान या बाळांच्या आवाजाने तिथे आली होती. त्यांनी या बाळांच्या आजुबाजूला संरक्षक कडेच केले होते. कारण काही रानटी कुत्री देखील तिथे येत होती. त्या रानटी कुत्र्यांवर पाळीव श्वान भुंकत होती आणि बाळांजवळ येऊ देत नव्हती.