ठाणे : रस्त्यात खड्डे कीखड्ड्यांत रस्ते, अशा चक्रात सध्या ठाण्यातील रस्ते सापडले आहेत. पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून रस्तेबांधणीत हातसफाई होत असल्याचा आरोप करत ठाणे मनसेने याविरोधात दंड थोपटले आहेत. खड्ड्यांत डॉल्फिन मासा सोडून अनोख्या पद्धतीने मनसेने रस्ते घोटाळ्याचा निषेध केला आहे.ठाण्यातील रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. अपघाताचे प्रमाण वाढले असून या वाढत्या अपघातांना भ्रष्ट सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. ठाण्यातील खड्डे घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी ठाणे मनसेने बुधवारी माजिवडा येथे खड्ड्यांमधील पाण्यात डॉल्फिन मासा सोडून अनोख्या पद्धतीने भ्रष्ट यंत्रणेचा निषेध केला.
खड्ड्यात सोडला डॉल्फिन मासा!
By admin | Published: August 04, 2016 2:49 AM