ऑनलाइन लोकमतडोंबिवली, दि. 2 - डोंबिवलीकरांचा प्रमुख हमरस्ता असलेल्या पूर्वेकडील केळकर रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. 18 मीटर रस्ता होणार असून, 9 मीटरवर लाकडांच्या बांबूचे दुभाजक म्हणून खांब टाकण्याचे काम सोमवारी रात्री सुरू झाले. उद्या मंगळवारी दिवसभरात अन्य तांत्रिक कामांची पूर्तता झाल्यानंतर रात्री खोदकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदारांच्या कामगारांनी दिली. आधी रिक्षा स्टॅन्ड जेथे आहे त्या अर्धा भागात खोदकाम व सीसी करण्यात येईल. या कामामुळे रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या रिक्षा स्टॅन्डसंदर्भात अद्याप जो काही निर्णय झाला आहे, त्याबाबत मात्र कोणतीही माहिती डोंबिवलीकर नागरिकांना नाही. मंगळवारी दिवसभरात त्याबाबतचे नोटिफिकेशन निघेल, असे वाहतूक नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. साधारणपणे दीड-दोन महिने हे काम सुरू असेल, तोपर्यंत मात्र नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार असून रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जास्तच जटील होणार आहे.
केडीएमसीच्या गोंधळामुळे डोंबिवलीकरांची उडणार तारांबळ
By admin | Published: January 02, 2017 11:39 PM