शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

डोंबिवलीत पर्यावरणाची ‘सायकल’

By admin | Published: June 05, 2017 3:28 AM

पर्यावरण दिन आला की, अनेक जण एका दिवसापुरती सायकल चालवतात.

जान्हवी मोर्ये। लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पर्यावरण दिन आला की, अनेक जण एका दिवसापुरती सायकल चालवतात. मात्र, ‘डोंबिवली सायकल क्लब’चे सदस्य ३६५ दिवस सायकल चालवून सुदृढ आरोग्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत. त्यामुळे पाच वर्षांत सायकल चालवणाऱ्यांची तसेच क्लबच्या सदस्यांची संख्या वाढली आहे. या क्लबचे अनेकांनी अनुकरण केल्यास भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसतील, अशी अपेक्षा पर्यावरण दिनानिमित्ताने व्यक्त होत आहे.डोंबिवली सायकल क्लबचे डॉ. सुनील पुणतांबेकर म्हणाले की, क्लबची सुरुवात ५ फेब्रुवारी २०१२ ला झाली. आज सदस्यांची संख्या १५० वर आहे. त्यात वय वर्षे नऊ ते ७९ वयापर्यंतची मंडळी आहेत. क्लबचे सदस्य रोज सायकलने फेरफटका मारतात. परंतु, प्रत्येक रविवारी सदस्य न चुकता भेटून सकाळी ६ ते ८.३० दरम्यान किमान १५ किलोमीटरचा प्रवास करतात. काही सदस्य तर बदलापूर, शीळफाटा इथपर्यंत सायकलने प्रवास करतात. गणेश मंदिरापासून सायकल चालवण्यास सुरुवात होते. क्लबचे सदस्य विश्वनाथ अय्यर व शशांक वैद्य हे दोघे जण अधूनमधून ठाणे व नवी मुंबईत कामावर जाताना सायकलने जातात. सायकल प्रवासाबरोबरच क्लबचे सदस्य झाडे जगावीत, ती वाचावीत, यासाठी प्रयत्नशील आहेत. सायकलवरून भ्रमंती करताना ते आजूबाजूच्या गावांत फळांच्या बिया फेकतात. पावसाळ्यात तेथे झाडे उगवतात. एक दिवस सायकल चालवून भागत नाही. त्यात सातत्य हवे. तर, आरोग्य चांगले राहते, असे सदस्यांचे म्हणणे आहे.क्लबने डोंबिवली शहरात सायकलला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. सायकल क्लबमध्ये इतर कोणताही विषय चर्चिला जात नाही. सायकलविषयीच माहिती दिली जाते. कोणती सायकल खरेदी करावी, तिची दुरुस्ती व देखभाल कशी करावी, यावर अधिक भर दिला जातो. आता मोटारसायकल, स्कूटर चालवणाऱ्यांचे प्रमाण भरमसाट वाढले आहे. त्यामुळे वायुप्रदूषण होते. ते सायकलकडे वळल्यास प्रदूषण रोखता येईल.आज वृक्षारोपणपुणतांबेकर यांनी स्वत: २०११ मध्ये मुंबई ते गोवा हा प्रवास सायकलवरून केला आहे. क्लबच्या सदस्या ममता परदेशी यांनीही मुंबई ते पणजी सायकलप्रवास केला आहे. पर्यावरण दिनानिमित्त क्लबतर्फे उद्या सोमवारी झाडांची रोपे लावली जाणार आहेत. त्या झाडांची निगारणीही करण्याचा प्रयत्न क्लबतर्फे यंदाच्या वर्षापासून केला जाणार आहे.