ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - डोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटाच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. फडणवीस यांनी टि्वटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.
डोंबिवलीत झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल ऐकून दु:ख झाले. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांबरोबर चर्चा केली असून, त्यांना वेगाने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी टि्वटरवरुन दिली.
Spoke to police officials & local authorities and asked them to speed up the relief operations.#Dombivali (2/3)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 26, 2016
स्थानिक प्रशासनाच्या आम्ही सतत संपर्कात आहोत. मदत कार्यात आम्ही कोणतीही कसूर ठेवणार नाही असे फडणवीस यांनी सांगितले. गुरूवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील अभिनव शाळेसमोरील 'आचार्य' केमिकल कंपनीतील बॉयलरचा शक्तीशाली स्फोट झाला.
Saddened to know about the unfortunate & tragic incident that took place at Dombivali.(1/3)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 26, 2016
We are constantly in touch with the local administration and we would leave no stone unturned in our efforts & relief operation.(3/3)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 26, 2016
या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जण ठार झाले असून, १०० अधिक नागरिक जखमी झाले आहेत. नेमके चित्र अजूनही स्पष्ट झालेले नसून, पुणे तळेगाव येथून एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी येण्यासाठी निघाल्या आहेत. दूरचित्रवाहिनीवरील दृश्यांमध्ये जमीनदोस्त झालेल्या इमारती, ढिगारा आणि रक्तबंबाळ जखमी अवस्थेतील नागरिक असे मन विचलित करणारी दृश्ये दिसत आहेत.