शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

घरगुती हिंसाचार कायद्यात ‘वाइफ’ऐवजी ‘स्पाउस’ करा

By admin | Published: May 17, 2017 2:23 AM

घरगुती हिंसाचार कायदा हा पत्नीकेंद्रित आहे. या कायद्यात पुरुषांच्या बाजूचाही विचार होणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने या कायद्यात तरतूद करून ‘वाइफ’ऐवजी ‘स्पाउस’ शब्द

निमित्त तापकीरच्या आत्महत्येचे ( भाग - १)- स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरगुती हिंसाचार कायदा हा पत्नीकेंद्रित आहे. या कायद्यात पुरुषांच्या बाजूचाही विचार होणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने या कायद्यात तरतूद करून ‘वाइफ’ऐवजी ‘स्पाउस’ शब्द समाविष्ट केला पाहिजे, अशी मागणी पुरुषांच्या न्याय व हक्कांसाठी काम करणाऱ्या वास्तव फाउंडेशनने केली आहे. मराठी चित्रपट निर्माता अतुल तापकीर आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे.घरगुती हिंसाचार अधिनियम कायदा कायद्याचा अनेक महिलांकडून गैरवापर वाढला आहे. म्हणूनच देशभरात दर नऊ मिनिटाला एक पत्नीपीडित पुरुष आत्महत्या करतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. कौटुंबिक हिंसाचारातून महिलांची सुटका करून देण्यासाठी घरेलू हिंसा अधिनियम कायदा देशभर लागू करण्यात आला. या कायद्याचे हत्यार पत्नीच्या हाती लागले, तेव्हापासून देशभरात पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, असे ‘वास्तव’ फाउंडेशनचे संस्थापक अमित देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महिलांनी पुरुषांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. पत्नीला कायद्याने संरक्षण देताना, हा कायदा घरातल्या कर्त्या पुरुषाच्या अधिकारावर गदा आणत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कुटुंबासह पत्नी, प्रेयसीकडून होणाऱ्या कोणत्याही छळाविरुद्ध आवाज उठविण्याचा अधिकार देशातील पुरुषाला नाही. महिलेच्या नुसत्या तक्रारीवर पुरुषाची रवानगी थेट कारागृहात होऊ शकते. अशा स्वरूपाच्या कोणत्याही प्रकरणात महिलेला सहानुभूती दाखवत, सगळे खापर पुरुषाच्या माथी फोडले जाते. सध्याच्या भारतीय दंडसंहितेतील ही उणीव लक्षात घेता, पुरुषांना मूलभूत हक्क आणि कायद्याचे संरक्षण देण्यासाठी ‘सेव्हिंग मॅन फ्रॉम इंटिमेंट टेरर अ‍ॅक्ट’ (स्मिता) कायद्याचा मसुदा २०१५ साली तयार करण्यात आला आहे. हा कायदा लागू झाला, तर देशभरातील पुरुषांना घरगुती हिंसाचार, पत्नीकडून होणारा छळ, प्रेयसीकडून होणारी प्रतारणा, पालकांकडून होणारी पिळवणूक यासारख्या समस्यांतून मुक्ती मिळणार आहे .‘स्मिता’ कायद्यातील सूचना- महिलांप्रमाणे पुरुषांसाठी आयोग स्थापन करावा- पुरुषांना कायद्याचे भक्कम संरक्षण द्यावे- पुरुष कल्याण मंत्रालयाची स्थापना करावी- अस्तित्वात असणाऱ्या कायद्यांनुसार सुनावणीवेळी समान अधिकार, समान न्याय द्यावातीव्रता नाही, तोपर्यंत विचार नाहीएखाद्या कायद्यात नव्याने तरतूद करण्याची प्रक्रिया सोपी नसते. त्यामुळे घरगुती हिंसाचार कायद्यात ‘वाइफ’ऐवजी ‘स्पाउस’ अशी तरतूद होण्याची प्रक्रिया मोठी आहे. त्याकरिता, पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाची तीव्रता अधिक आहे, याची जाणीव यंत्रणांना झाली पाहिजे. त्यानंतर, याविषयी विचार केला जाऊ शकतो. पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाची दाहकता जोपर्यंत यंत्रणेला होत नाही, तोवर यावर तोडगा निघणे कठीण आहे.- अ‍ॅड. परेश देसाई, कौटुंबिक न्यायालयमसुदा सादरअनेक वेळा केवळ धडा शिकविण्यासाठी पुरुषांना हुंडा प्रतिबंधक, कौटुंबिक हिंसाचार , शारीरिक छळ यासारख्या गुन्ह्यांमध्ये गोवले जाते. परिणामी, अनेक पुरुष निष्पाप असताना, केवळ ठपका बसल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. या प्रकरणी ‘स्मिता’ कायद्याचा मसुदा तयार आहे. तो राज्यसभेच्या संसदीय समितीला सादर केला आहे. आता केवळ कोणत्याही पक्षाच्या खासदाराने या विषयावर वाचा फोडणे अत्यंत गरजेचे आहे. - अमित देशपांडे, वास्तव फाउंडेशन, संस्थापक