कोल्हापूर : भाविकांनी देवाला देणगीरूपात अर्पण केलेल्या ५००, १००० च्या नोटा बँकेत भरणा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासह सांगलीतील हरिपूर येथील मंदिरांतील दानपेट्या बुधवारपासून उघडण्यात आल्या. अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांमधील रकमेची मोजदाद गुरुवारी पूर्ण होईल. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील ३०६५ मंदिरे आहेत. यातील बहुतांश मंदिरे ही ग्रामीण भागात असून, त्यापैकी ११ देवस्थानांमध्ये देवस्थान समितीच्या दानपेट्या आहेत. त्यातील रक्कम दर महिन्याला देवस्थान समितीच्यावतीने बँकेत भरली जाते. बुधवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दानपेट्या उघडण्याचे आदेश दिले. या दानपेटीतील रकमा बँकेत भरण्यासाठी देवस्थान समितीचे सर्व कर्मचारी, आयसीआयसीआय बँकेचे कर्मचारी अशी ५० जणांची यंत्रणा कामाला लागली आहे. (प्रतिनिधी)
अंबाबाई मंदिरांतील दानपेट्या उघडल्या
By admin | Published: November 17, 2016 4:56 AM