शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

'निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका, लोक उद्या प्रश्न विचारतील', नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 18:42 IST

'महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला अभूतपूर्व विजय मिळवून दिला, आता त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आहे.'

Nitin Gadkari In BJP Convention: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (12 जानेवारी 2025) महाराष्ट्र भाजपच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले कार्यकर्ते आणि निवडून आलेल्या नेत्यांना एक मोलाचा सल्ला दिला. 'फक्त निवडणुका जिंकून समाधानी न राहता, जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायचे आहे', असे नितीन गडकरी म्हणाले.

गडकरी पुढे म्हणतात, 'महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. त्यांनी शिवाजी महाराजांसारखे जनहिताचे सरकार दिले. आता आपल्यावर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि सामाजिक एकोपा आणण्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील विजयानंतर आता राज्यात सुराज्य आणायचे आहे. सामजिक परिवर्तन सत्तेच्या माध्यमातून घडवून आणले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया गडकरींनी यावेळी दिली.

आपल्या कृतीतून ओळख निर्माण होते'निवडणुकीतील जय-पराजयाने कोणी लहान किंवा मोठा होत नाही. आपली ओळख आपल्या कामावरुनच ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणूक हरले, पण त्यांच्या विरोधातील विजयी उमेदवार कोणालाच माहीत नाही. याउलट, बाबासाहेब जगभर ओळखले जातात. महाराष्ट्रात जातीच्या राजकारणातून द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, पण माणूस त्याच्या कामाने मोठा होतो, जातीने नाही.' 

निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका'काँग्रेसचा पराभव करून समाधानी राहू नका. तुम्हाला लोकांच्या जीवनात बदल घडवून आणायचा आहे, नाहीतर तुम्ही काय केले? असा सवाल लोक विचारतील. त्यांनी जे केले, तेच तुम्ही करू नका. आपल्याला आधीच्या सरकारांपेक्षा दहापट चांगले काम करायचे आहे. महाराष्ट्रात प्रत्येक तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे. केवळ स्मार्ट शहरे नसून स्मार्ट गावे व्हायला हवीत. लोक मजबुरीने शहरात येतात. कार्यक्रमानंतर मी काश्मीरला जाणार आहे. उद्या पंतप्रधान मोदींसोबत बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. मी काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांनी मला सांगितले की तुम्ही इतके चांगले रस्ते बनवलेत, पर्यटक तिपटीने वाढले आहेत. लोक वाढले. आज महाराष्ट्रात किती मोठी पर्यटन स्थळे आहेत? आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे ही सर्वात मोठी देशभक्ती आहे,' असंही गडकरी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस