मुंबई: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून ओळखलं जातं. सरकारविरोधात निघालेल्या मोर्च्यांना, आंदोलनांना सामोरं जाऊन यशस्वी शिष्टाई करण्याची कामगिरी महाजन यांनी अनेकदा पार पाडली आहे. आंदोलकांच्या समस्या ऐकून समेट घडवण्याचं काम महाजन यांनी यशस्वीपणे केलं आहे. मुख्यमंत्र्यांना मदत करताना कधी स्वत:च मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का, असा प्रश्न महाजन यांना लोकमत फेसबुक लाईव्हमध्ये विचारण्यात आला. राजकीय पेचात टाकणाऱ्या या प्रश्नाला सरकारचे संकटमोचक महाजन यांनी खुबीनं उत्तर दिलं. 'तुम्ही सरकारविरोधातील मोर्च्यांना सामोरे जातात. अनेकदा त्यांच्यासोबत रस्त्यावरुन चालतात. मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक अशी तुमची ओळख आहे. आपण मुख्यमंत्री व्हावं, असा विचार कधी डोक्यात आला का?', असा प्रश्न लोकमत फेसबुक लाईव्हमध्ये महाजन यांना विचारला गेला. त्यावर 'मी माझ्याकडे दिलेल्या जबाबदाऱ्यांना न्याय देत आहे. माझ्याकडे सध्या अनेक महत्त्वाची खाती आहेत. त्यात मी आनंदी आहे. मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार नाही. असा विचार कधीच माझ्या मनात आलेला नाही,' असं उत्तर महाजन यांनी दिलं.
Exclusive: मुख्यमंत्री व्हायचा विचार आहे का?; गिरीश महाजन म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 1:44 PM