शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

मी देवाधर्माचे प्रदर्शन करत नाही, आम्ही प्रबोधनकार वाचलेत; धर्माचा बाजार नको - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 7:50 AM

‘राज ठाकरे यांच्या भाषणात भाजपबद्दल अवाक्षर नव्हते. महागाई, बेरोजगारीसारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांचा समावेश नव्हता. भाजपच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे भाषण झाले.

मुंबई :

राज ठाकरे यांच्या भाषणात भाजपबद्दल अवाक्षर नव्हते. महागाई, बेरोजगारीसारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांचा समावेश नव्हता. भाजपच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे भाषण झाले. भाजपने दिलेली जबाबदारी ते पार पाडत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणाचा समाचार घेतला. तर, मला माझ्या देवाधर्माचे प्रदर्शन करायला आवडत नाही, असे सांगत नास्तिकतेबद्दलच्या विधानावरही परखड भाष्य केले.

राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत केलेल्या आरोपांचा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून समाचार घेतला. एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यांतून वक्तव्य करून आपले मत व्यक्त करते, तेव्हा ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नसते. भाजपने केलेले मार्गदर्शन भाषणाच्या माध्यमातून ऐकायला मिळाले. त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे. त्यांच्या सभा मोठ्या होतात. सभेला लोक जातात. त्या सभेत शिवराळ भाषा असो की नकला यातून मात्र लोकांची करमणूक होते, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

‘आम्ही प्रबोधनकार वाचले, त्यांच्या कुटुंबातले लोक वाचत नसावेत’शरद पवार नास्तिक असल्याचे राज यांनी म्हटले होते. यावर, मी माझा धर्म आणि देव याबद्दल प्रदर्शन करत नाही. आजपर्यंत १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो असेन. माझ्या निवडणूक प्रचाराचा नारळ कोणत्या मंदिरातून फुटतो, हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा; पण आम्ही कधीही त्याचा गाजावाजा केला नाही. आयुष्यात माझ्यासमोर काही आदर्श आहेत, त्यापैकी प्रबोधनकार ठाकरे हे एक आहेत. प्रबोधनकारांनी देव किंवा धर्म यांच्या नावाने बाजार मांडणाऱ्यांवर प्रचंड टीका केली होती. याचा अर्थ त्यांनी धर्माचा अनादर केला नाही; पण देव आणि धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या घटकांना चोपण्याचे काम केले. आम्ही प्रबोधनकारांचे लिखाण वाचतो; पण सर्वच जण किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक, ते वाचत नसावेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.

मी आणि अजित वेगळे आहोत का? अजित पवारांच्या घरी छापा पडतो; पण सुप्रिया सुळेंच्या नाही, या राज ठाकरे यांच्या विधानावर ते काहीतरी बालिश भाषण करतात. पोरकट आरोप असल्याची संभावना पवार यांनी केली. अजित पवारांकडे काही झाले तर माझ्याकडे झाले, असे आहे. अजित आणि मी वेगळे आहोत का? अजित आणि सुप्रिया बहीण- भाऊ नाहीत का?, अशा शब्दांत पवार यांनी संताप व्यक्त केला. किरीट सोमय्यांची कृती आक्षेपार्ह विक्रांतसाठी पैसे गोळा केले, हे बातम्यातून स्पष्ट दिसते आहे. पैसे गोळा केले तर त्याचा विनियोग काय केला? माझ्या वाचनात आले की, तो निधी पक्षाकडे जमा करण्यात आला. भावनेला हात घालून विक्रांतसाठी पैसे गोळा केले गेले. मग तो एक रुपया असो किंवा अकरा हजार रुपये ते पक्षाकडे का दिले? ते पैसे सैन्य दल किंवा नौदलला देता आले असते. माझ्या मते हे आक्षेपार्ह आहे, असे पवार म्हणाले.

छत्रपतींचेच विचार मांडतो- दोनच दिवसांपूर्वी अमरावतीतील भाषणात २५ मिनिटे महाराजांच्या योगदानावर बोललो. अर्थात मला रोज वृत्तपत्र वाचायची सवय आहे. त्यासाठी लवकर उठावे लागते. खूपवेळा वृत्तपत्रात काय काय लिहिले आहे, हे न वाचता एखादा वक्तव्य करत असेल तर त्याला दोष देणार नाही. - राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचले होते. शाहू-फुले-आंबेडकर यांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे, असेही पवार म्हणाले.- शिवरायांना घडविण्यात माँ जिजाऊंचे योगदान होते; परंतु पुरंदरेंनी ते वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न केला. तो योग्य नव्हता, असे माझे मत तेव्हाही होते व ते आजही कायम असल्याचे पवार म्हणाले.- एस. टी. कामगारांच्या आंदोलनाला चुकीचे नेतृत्व मिळाले. या चमत्कारिक नेतृत्वाने फक्त माझ्याबाबत द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे