पुणे/मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज पुण्यात राजाराम पुलाजवळ नवीन फ्लायओव्हर उभारण्याच्या कामाचे भूमीपूजन केले. य़ावेळी ग़डकरींनी पुण्यातील मेट्रो, हवा-ध्वनी प्रदूषण यावर भाष्य केले. तेव्हा स्वारगेटची हवा म्हणजे साखर वाटायची आता श्वास घेता येत नसल्याचे ते म्हणाले. (Nitin Gadkari in Pune told, why they warn meeting with Bajaj Auto, TVS motors Owners. )
यावेळी गडकरींनी हवा प्रदुषणावर दोन बड्या कंपन्यांच्या मालकांना कसे झापलेले तो किस्सा सांगितला. ब्राझीलमध्ये इथेनॉलवर चालणारी सर्वच कंपन्यांची वाहने आहेत. परंतू भारतात नाहीत. बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर्सचे मालक कामानिमित्त भेटायला आले होते. त्यांना जोवर तुम्ही ईथेनॉलवर स्कूटर बनवत नाही तोवर मला पुन्हा भेटायला यायचे नाही, अशी ताकीद दिली होती. तुमची कामे करणार नाही असे बजावले होते. आता टीव्हीएसने फ्लेक्स इंजिनवरील स्कूटर बनविली आहे. पुण्यातही इथेनॉलचे तीन पंप आहेत, असा किस्सा सांगितला.
मी देखील एक शेतकरी आहे. नागपूरमध्ये मी शेतकऱ्यांसाठी मेट्रोमध्ये दोन डबे जोडले आहेत. पुण्यातही ते होऊ शकते. राज्य सरकारने 100 मेट्रो विकत घ्याव्यात. करामध्ये दिलासा द्यावा, असा प्रस्ताव नितीन गडकरींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ठेवला. सध्या जो काही पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांचा धुमाकूळ सुरु आहे, तो बंद होईल. मला माझ्या आयुष्यात पेट्रोल, डिझेलचा वापर संपवायचा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे देखील गडकरींनी सांगितले.
याचबरोबर गडकरींनी पुणे-बंगळुरु नव्या महामार्गाची घोषणा देखील केली. हा मार्ग फलटन, सोलापूर असा जाणार आहे. या रस्त्याशेजारच्या जमिनी राजकारणी विकत घेतील. त्यापेक्षा त्या राज्य सरकारने विकत घ्याव्यात. मी देखील मदत करायला तयार आहे. एनएचएकडून 8-10 हजार कोटी रुपये देण्यास तयार आहे. पुण्याबाहेर नवीन पुणे उभारण्याची गरज आहे, असे गडकरी म्हणाले.
प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन धावलं तरच कामं होतात- नितीन गडकरी
आजच्या भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते.