रणजित इंगळे
ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar)) यांच्यावर भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले असता आता त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाडांनी भाष्य केले आहे. आता १९९३ च्या आठवणी काढू नका. नथुराम गोडसेने गांधींची हत्या केली? पेढे कोणी वाटले गुलाल कोणी उधळला. संविधान कोणी नाकारलं. तिरंगा वाद कोणी केला हे सर्व कुठे काढायचे. आता आपण २०२३ मध्ये जाऊ आता उगाच इतिहास खोदून त्यातील सर्व बाहेर काढणे माझ्या दृष्टीने चुकीचा आहे. काही विषय तिथल्यातिथे बंद करायचे असतात असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, कलम ३७० ला बाबासाहेबांचा विरोध असता तर मग ते संविधानात आलं कसं हे मला समजत नाही. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न केला पण त्याला विरोध झाला त्या हिंदू कोड बिलमध्ये महिलांना पन्नास टक्के वाटा देण्याचं ठरलं होतं परंतु तेव्हाची परिस्थिती पुरुषप्रधान संस्कृती म्हणून मानले जायचे म्हणून त्या वेळच्या राजकीय नेत्यांना आणि सरकारला तेव्हा महिलांना ५० टक्के देणे योग्य वाटलं नव्हतं परंतु ते बाबासाहेबांना वाटले होते. ३७० वरून कुठेही वाद झालेला मी ऐकला नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. तसेच काश्मीरच्या पंडितांच्या विकासामध्ये तुमचे योगदान किती हे पहिले दाखवावे. चित्रपट दाखवून काय होणार? असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.
तसेच इशरत जहाला राष्ट्रवादीने मदत केली असं कोणीही म्हटलं नाही. देवेंद्र फडणवीस काही आरोप करतील खरे मानायचे का? आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर काय द्यावे असंही आव्हाडांनी म्हटलं आहे. त्याचसोबत मला जेम्स लेनचा वाद पुन्हा घालायचा नाही जेव्हा तो घालायचा होता तेव्हा हे घरात बसले होते. जेम्स लेनचे पुस्तक पहिल्यांदा बाजारात आमच्या काही मित्रांनी आणले आणि त्यात मुख्य माणूस किशोर ढमाले होते. म्हणून या विषयात पुन्हा मला वाद घालायचा नाही. राज ठाकरे यांनी भाषणात विषय घेतला. माझ्यावर आणि शरद पवारांची टीका केली म्हणून त्याला मी उत्तर दिले. बाकी मी राज ठाकरे बद्दल कधीही बोललेलो नाही असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटले.