राज्यात फेक नरेटिव्ह पसरवू नका, काँग्रेसची भाजपवर टीका, आजपासून राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 10:44 AM2024-09-02T10:44:23+5:302024-09-02T10:45:05+5:30

Congress Criticize BJP: काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह भाजप पसरवत असल्याचे सांगून सोमवार, २ तारखेपासून राज्यभर काँग्रेस जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे काँग्रसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Don't spread fake narrative in the state, Congress criticizes BJP, 'Jode Maro' movement across the state from today | राज्यात फेक नरेटिव्ह पसरवू नका, काँग्रेसची भाजपवर टीका, आजपासून राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन

राज्यात फेक नरेटिव्ह पसरवू नका, काँग्रेसची भाजपवर टीका, आजपासून राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करुन भाजप सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत, भाजपने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे, या अपमानाविरोधात काँग्रेसने जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह भाजप पसरवत असल्याचे सांगून सोमवार, २ तारखेपासून राज्यभर काँग्रेस जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे काँग्रसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत’, असे पंडित जवाहरलाल नेहरु यांनी प्रतापगडावरील पुतळा अनावरणाच्या वेळी सांगितले होते. आता पंडित नेहरुंच्या नावाने भाजप अपप्रचार करत आहेत. अर्धवट माहितीच्या आधारावर देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. ‘नेहरु यांच्याबद्दलचा अपप्रचार फडणवीस यांनी थांबवावा.  असे पटोले म्हणाले. 

‘हा प्रकार राजकारणापलिकडचा’ 
- यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, पुतळा कोसळल्याचा प्रकार राजकारणापलिकडचा आहे, या घटनेने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.
- १९ व्या शतकात कोण इतिहास लिहित होते हे सर्वांना माहित आहे, योग्य व्यक्तींनी लिहिलेलाच इतिहास वाचला पाहिजे असे शाहू महाराज म्हणाले.

‘जनतेच्या मनात प्रचंड राग’
अ. भा. काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे चेअरमन पवन खेरा यावेळी म्हणाले की, पुतळा कोसळ्याने देशभरातील जनतेच्या मनात प्रचंड राग आहे.
फक्त पुतळा कोसळला नाही तर लोकांचे मन दुखावले आहे. धमकीच्या स्वरात मागितलेली माफी मंजूर नाही. महाराजांच्या अस्मितेशी चालवलेला खेळ खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Don't spread fake narrative in the state, Congress criticizes BJP, 'Jode Maro' movement across the state from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.