राहुल गांधींनी काय बोलावं हे तुम्ही सांगू नका; काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 07:40 PM2022-11-19T19:40:23+5:302022-11-19T19:41:06+5:30

राहुल गांधी तिरस्कार कुणाचा करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांची आहे असं काँग्रेसनं म्हटलं.

Don't tell Rahul Gandhi what to say; Congress told Uddhav Thackeray | राहुल गांधींनी काय बोलावं हे तुम्ही सांगू नका; काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं

राहुल गांधींनी काय बोलावं हे तुम्ही सांगू नका; काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं

Next

बुलढाणा - आम्ही सरकारमध्ये एकत्र आलो तेव्हा आम्ही आमची भूमिका सोडावी, त्यांनी त्यांची भूमिका सोडावी असं कुठल्याही पक्षाने अट ठेवली नव्हती. काँग्रेस पक्षाची भूमिका राहुल गांधी यांनी स्पष्ट केली आहे. आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. आमचे विचार स्पष्ट आहेत. आम्ही काय बोलावं, राहुल गांधींनी काय बोलावं याबाबत उद्धव ठाकरे आम्हाला सांगू शकत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे अशा शब्दात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सुनावलं आहे. 

माणिकराव ठाकरे म्हणाले की, आम्ही त्यांना विचार सोडून आमच्यासोबत या म्हटलं नव्हतं. आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येत किमान समान कार्यक्रम आखला. जो जनहिताच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. स्वातंत्र्यातील आमची भूमिका स्पष्ट होती. राहुल गांधींनी त्यांचा लेखी पुरावा दिला. भारत आणि पाकिस्तान फाळणीचा विचार सावरकर विचारसरणीच्या लोकांनी केला. हिंदू, मुस्लीम एकत्र राहू शकत नाही अशाप्रकारे विधाने, त्यांची भूमिका उघड आहे. काहींना माहिती आहे काहींना माहिती नाही. परंतु आता ते समोर येतंय. ठाकरेंमध्ये आणि आमच्यात वाद झाला नाही. त्यांची भूमिका ते मांडतायेत, आमची भूमिका आम्ही मांडतोय. त्यामुळे वाद झाला, आता सोबत येणार नाही वैगेरे या चर्चेला अर्थ नाही असं काँग्रेस नेते ठाकरेंनी सांगितले. 

त्याचसोबत राहुल गांधी तिरस्कार कुणाचा करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांची आहे. धार्मिक द्वेषामुळे तिरस्कार होतो. ना मुस्लीम, ना हिंदु. ना बौद्ध असा विचार न करता राष्ट्राच्या हितासाठी सर्वांना जोडून पुढे जायला हवं. एका धर्माला अधिक प्राधान्य न देता सगळ्यांना सोबत घ्यायला हवं. देश एकसंघ ठेवायचा असेल तर भारत जोडो यात्रा यातून ते स्पष्ट होतंय. काँग्रेसला भाजपा जोडो विचार करायचा आहे तर विरोधकांना भारत तोडो असं करायचं आहे. धार्मिक तेढ निर्माण केले तर देशात सौख्य कसे राहील? हीच भूमिका राहुल गांधी यांच्या भारत जोडोची आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्न देशाच्या हिताचे आहे. संसदेत चर्चा होत नाही. त्यामुळे हे प्रश्न भारत जोडोच्या माध्यमातून मांडले आहे असं माणिकराव ठाकरे म्हणाले. 

काय म्हणाले होते संजय राऊत?
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचं काहीच कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असं उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Don't tell Rahul Gandhi what to say; Congress told Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.