शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

पावसाचे कारण पुढे करून अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करू नका, काँग्रेसचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 2:18 PM

Maharashtra Monsoon Session 2023: मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे.

मुंबई - मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्य सरकार पावसाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम ४ ऑगस्टपर्यंत ठरलेला आहे. हा दुसरा आठवडा सुरु आहे. आणखी एक आठवडा बाकी असताना अधिवेशन संपवणे हे योग्य नाही. राज्यात आज अनेक समस्या आहेत, शेतकरी, कष्टकरी, तरुणवर्ग, महिला, बेरोजगारी, महागाईसह अनेक प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींसाठी अधिवेशन हेच महत्वाचे व्यासपीठ आहे. सरकारने जनतेच्या प्रश्नासाठी अधिवेशन पूर्ण वेळ चालवले पाहिजे.

राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम.शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांची स्तुती केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशात गांधी आणि गोडसेवर नेहमीच चर्चा होत आली आहे. गांधी विचाराला माननारा मोठा वर्ग आहे परंतु संघ परिवाराने गांधी परिवाराची नेहमीच बदनामी केली आहे. गांधी हे हिंदू विरोधी आहेत असा अपप्रचार करून गांधी परिवाराची बदनामी करण्याचे काम संघ परिवार करत आला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना अनेक वर्ष संघ विचारातून आलेल्या भाजपाबरोबर युतीत होती. आरएसएस गांधींबद्दल जे सांगत होते ते चुकीचे आहे हे त्यांना आता समजले आहे. राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, देशाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात आहे. उद्धव ठाकरे यांना आता वास्तवाची जाणीव झाली आहे. भाजपा हा कोणाचाही नाही, हिंदू, मुस्लीम, शिख ख्रिश्चन कोणाचाच नाही, भाजपा फक्त धर्माच्या नावावर राजकारण करत असून भाजपा फक्त सत्तेचा आहे असे पटोले यांनी सांगितले.

शिक्षणक्षेत्र भ्रष्टाचारमुक्त करा...विधानसभेतील चर्चेत भाग घेत नाना पटोले म्हणाले की, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणातून आपण पिढ्या घडवतो, मानवी जिवनासाठी शिक्षण महत्वाचे आहे. या क्षेत्रातील भ्रष्टाचार उपटून टाकण्यासाठी मुळावर घाव घातला पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नसते, या भ्रष्टाचारात शिक्षण संस्थांचाही दोष आहे. पण शिक्षण क्षेत्रात पसरलेला हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे, असे पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMaharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३congressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार