शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

साठीच्या उंबरठयावरचे धडपडणारे ''दूरदर्शन''.. !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:32 AM

नव्वदच्या दशकात शहर आणि ग्रामीण भागात घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणात दूरचित्रवाणी (टीव्ही) चे जाळे पसरण्यास सुरुवात झाली.

ठळक मुद्देनवनवीन माध्यमं आणि वेब पोर्टलचे आव्हान

- दीपक कुलकर्णी- पुणे : तीस पस्तिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिढीच्या लहानपणी घरोघरी नाही पण काही ठराविक घरात आढळणारं माध्यम होतं टीव्ही. त्यावेळी टीव्हीवर वरचष्मा आणि दरारा होता तो फक्त दूरदर्शनचा.. प्रत्येकजण वेळातवेळ काढून व वाट्टेल ते कष्ट पचवून दूरदर्शनशी जोडला जाण्यासाठी धडपडत होता..परंतु, बदलते तंत्रज्ञान व तरुण पिढीशी नाळ जोडण्यात दूरदर्शन कमी पडले.. खरंतर दूरदर्शनच्या स्थापनेला साठ वर्ष पूर्ण झाले आहे... एकेकाळी यशाचा अभूतपूर्व काळ पाहिलेले दूरदर्शन आज मात्र काळाच्या ओघात अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडते आहे.. 

काळ बदलला कि माध्यमं बदलतात..आणि प्रत्येकजण उच्च असो की नसो स्वत:ला त्या माध्यमाशी जुळवून घेतो.. पण नव्वदच्या दशकात शहर आणि ग्रामीण भागात घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणात दूरचित्रवाणी (टीव्ही) चे जाळे पसरण्यास सुरुवात झाली. त्यावेळी दूरदर्शनचे एक मोठे प्रस्थ होते. या चॅनेलने   श्राव्य प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात दृक माध्यमांत परावर्तित करण्याचे मोठे काम केले.इतके दिवस आकाशवाणीच्या माध्यमातृन श्राव्य तंत्राने फक्त आवाजाद्वारे रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या कलाकारांना नव्याने ओळख प्राप्त करून देत घरोघरी झळकवण्यासाठीचे नवे अवकाश व व्यासपीठ उपलब्ध करून दिले..तसेच दूरदर्शनने नव्या माध्यमाचे प्रतिनिधी म्हणून प्रेक्षकांच्याही विचारांच्या कक्षा रुंदावण्यात सिंहाचा वाटा उचलला..त्यावरील मालिका,  सांगितिक, कृषी, आहार विहार, आरोग्य , ऐतिहासिक यांसारख्या कार्यक्रमांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक जागा निर्माण केली होते..साठीच्या उंबरठ्यावर दूरदर्शनसमोर अनेक नवे आव्हाने उभी आहेत. टीव्हीवर रोज एका नव्या चॅनेल्सची व आॅनलाईन पोर्टलची संख्या भरमसाठ पद्धतीने वाढते आहे. तरुण पिढीची कास ओळखून हे चॅनेल्स आणि पोर्टल विविध कार्यक्रमांची पर्वणी रसिकांसाठी देत आहे..अनेक पर्याय अगदी सहज प्रेक्षकांच्या समोर उपलब्ध असताना दूरदर्शन मात्र शहरी भागात तरी दिसेनासे झाले आहे..जर या स्पर्धेच्या युगात दूरदर्शनला टिकायचे असतील तर काही अपरिहार्य बदल निश्चितपणे करावे लागतील..दूरदर्शनच्या तनुजा वाडेकर म्हणाल्या, इतके दिवस दूरदर्शन हे बिटा टेक या स्वरूपात प्रसारित होत होते मात्र आता एचडी पर्यायात प्रेक्षकांना उपलब्ध झाले आहे. सध्या जरी दूरदर्शन स्पर्धेच्या युगात नसले किंवा नवनवीन निर्मिती प्रक्रियेत पाठीमागे असले तरी ग्रामीण भागात अजूनही दूरदर्शनची लोकप्रियता बऱ्यापैकी टिकवून आहे.तिथे कृषीविषयक कार्यक्रम अगदी आवर्जून पाहिले जातात..त्या प्रेक्षकांचे पत्राद्वारे अभिप्राय सुद्धा आमच्यापर्यंत येतात. मात्र,  गेल्या दोन वर्षात काळाची पावले ओळखून या वाहिनेने नवे बदल  करण्यास सुरुवात केली आहे. तसेच केंद्र सरकारकडून देखील दूरदर्शनच्या अस्तित्वाला नवी भरारी देण्यासाठी विविध प्रमुख जागांची भरती करण्यात येणार आहे..नवनवीन तंत्रज्ञानाच्या प्रांतात स्वत:ला प्रस्थापित करावे लागणार आहे. सरकारी दूरचित्रवाहिनी असल्याने अगदी व्यावहारिक नाही पण तरुणपिढीला आकर्षित करणारे व जोडणारे ठोस पावले टाकण्यासाठी प्रयत्न सुरु आहे...  ................दूरदर्शनवर काम करताना पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर , हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, सुरेश भट, पु. ल. देशपांडे यांसारख्या अनेक कलाकारांचे ऋणानुबंध जोडले गेले. त्याठिकाणी मी नोकरीला असलो तरी अविस्मरणीय अशी आनंद मला याकाळात लुटता आला. इथे जबदस्त माणुसकीचा अनुभव कलाकारणाकडून मिळाला. या सर्व कलाकारांनी दूरदर्शनवर भरभरून प्रेम केले.. मात्र स्पर्धेच्या युगात दूरदर्शन कुठेतरी हरवत चालले आहे असे आवर्जून वाटते.. परंतु काही पिढींच्या आजदेखील दूरदर्शन घर करून आहे.. अरुण काकतकर 

.....तरुण पिढीतले कलाकार आजदेखील सूत्रसंचालन, काही कार्यक्रमासाठी आवर्जून दूरदर्शनचा पर्याय निवडतात.. यशाच्या शिखरावर पोहचलेले कलाकार आजदेखील या वाहिनीवर तितकंच निर्विवाद प्रेम करतात. जरी सरकारी कक्षेत असल्याने प्रायव्हेट चॅनेल्स इतके बदल करता येणार नसले तरी दूरदर्शन लवकरच नव्या पिढीला आपलेसे करेल हा विश्वास वाट्तो..तनुजा वाडेकर, दूरदर्शन 

टॅग्स :PuneपुणेTelevisionटेलिव्हिजनMediaमाध्यमेSocial Mediaसोशल मीडिया