सुशांत मोरे / मुंबईएसटी महामंडळाकडून मुंबई-पुणे मार्गावर डबल डेकर बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने महामंडळाने डबल डेकर बस चालवणाऱ्या बस कंपन्यांकडून माहिती मागवण्यात आली. यातील एका कंपनीने उत्सुकता दाखवत त्याचा अभ्यास अहवाल तयार केला व ही बस मुंबई-पुणे मार्गावर धावणे अशक्य असल्याचे नमूद केले आहे. डबल डेकर बस बस मुंबई-पुणे या मार्गावर धावू शकेल का याची चाचपणी महामंडळाकडून गेल्या सात वर्षांत करण्यात आली. या वेळी डबल डेकर बस मुंबई-पुणे मार्गावर सुरू करण्याच्या उद्देशाने व्होल्वो, स्कॅनियासह काही कंपन्यांशी बोलणी सुरू केली. यात स्कॅनिया कंपनीने रुची दाखवली व या मार्गावरील अभ्यास केला. हा अहवाल नुकताच एसटीकडे सादर करण्यात आला. मुंबई-पुणे मार्गावर बस धावणे अशक्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे. या अहवालावर एसटीच्या संबंधित विभागाकडूनही टिप्पणी करत बस चालवणे शक्य नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. डबल डेकर बस आपल्याकडे बांधल्या जात नाहीत. परदेशात बस बांधल्या जातात आणि त्यांच्याकडे बसमध्ये डाव्या बाजूला वाहनचालक बसतो. आपल्याकडे तसे नाही. तसेच अनेक तांत्रिक अडथळेही आहेत. - रणजित सिंह देओल, एसटी महामंडळ-व्यवस्थापकीय संचालक
डबल डेकरला ‘रेड सिग्नल’
By admin | Published: March 29, 2017 3:53 AM