सुशांत मोरे ल्ल मुंबई
कोकण मार्गावर एखादी दुर्घटना घडल्यास या मार्गावरून प्रवास करणा:या प्रवाशांना दुसरा मार्ग उपलब्ध नसल्याने मनस्तापाला तोंड द्यावे लागते. मात्र आता हा दुहेरी मार्गाचा प्रश्न लवकरच ट्रॅकवर येणार असून, दुहेरी मार्गाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे 1क् दिवसांत पाठवण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली. या प्रकल्पासाठी 1,5क्क् कोटींचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले.
मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावर एकच मार्ग उपलब्ध असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास दोन्ही रेल्वेसेवा पूर्ण ठप्प होतात. त्यामुळे दुहेरी मार्ग असावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात असून मध्य आणि कोकण रेल्वेकडून तसे प्रयत्नही केले जात आहेत. मध्य रेल्वेकडून पेण ते कासू आणि कासू ते रोहार्पयतचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम लवकरच पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या 741 किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरणाचा प्रस्ताव तयार केला असतानाच आता येत्या 1क् दिवसांत तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय झाला आहे. या दुहेरी मार्गासाठी 1,5क्क् कोटी रुपये खर्च येणार असल्याचे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले. सरसकट दुहेरी मार्ग करणो कठीण असून तो टप्प्याटप्प्यात असेल, असे त्या म्हणाल्या. रोहा ते करंजाडी आणि बैंदूर ते ठोकूर असे टप्प्याटप्प्यात दुहेरीकरण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
6 ऑक्टोबर 2013 : सीएसटीहून मडगावकडे जाणा:या मांडवी ट्रेनचे दोन डबे दिवाणखवटीदरम्यान घसरले.
14 एप्रिल 2014 : संगमेश्वर-उक्शीदरम्यान बोगद्यात मालगाडीचे चार डबे घसरले. तब्बल 24 तासांनंतर कोकण रेल्वे पूर्ववत झाली.
4 मे 2014 : नागोठणो ते रोहादरम्यान दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनचे डबे घसरले. 19 तासांनंतर रेल्वे पूर्ववत.
24 ऑगस्ट 2क्14 : वीर ते करंजवाडीदरम्यान मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. सात दिवस
रेल्वे पूर्ववत होण्यास लागला कालावधी.
7 ऑक्टोबर 2014 : वालोपे स्टेशनजवळ मालगाडीचे डबे घसरले.