ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १८ - अहमदनगर जिल्हयातील कोपर्डी येथे एका मुलीवर गावगुंडांनी बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या केली. त्या घटनेचा तीव्र निषेध करीत आरोपींना फाशी देण्याची मागणी मराठा सेवा संघ -संभाजी ब्रिगेड व सर्व कक्षांनी येथील पाटणी चौकात धरणे आंदोलनातून केले.मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले यांच्या अध्यक्षतेखाली व संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष सुभाषराव बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व कक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.