मुंबई : बुहचर्चित मुंबई महापालिकेचा प्रस्तावित विकास आराखडा (डीपी) अखेर रद्द करण्यात आल्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला. विकास आराखड्यातील सर्व चुका सुधारून नवा डीपी तयार करण्याचे आदेश त्यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत. ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंच्या ठिकाणी दाखवलेली आरक्षणे, मैदानांसाठी तरतूद नसणे आणि निवासी जागांवर आरक्षण, अशा एक ना अनेक कारणांमुळे मुंबईचा ‘डीपी’ वादग्रस्त बनला होता. सत्ताधारी शिवसेनेसह मनसे, काँग्रेस आणि भाजपातील काही मंडळींनी त्यावर तीव्र आक्षेप नोंदविला होता. एकूणच जनभावना या डीपीच्या विरोधात होती. डीपीवर चौफेर टीका झाल्यानंतर सरकारने डीपीतील उणिवांचा अभ्यास करण्यास मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात समिती नेमली होती. या डीपीमध्ये अनेक चुका असल्याचा प्राथमिक अहवाल या समितीने दिला होता. त्याचवेळी डीपीवर संक्रांत येणार, हे स्पष्ट झाले होते. (विशेष प्रतिनिधी)
डीपी रद्द!
By admin | Published: April 22, 2015 4:40 AM