संदीप प्रधान, मुंबईमुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा (डीपी) रद्द केला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी नगरविकास विभागातील अधिकारी डीपीतील केवळ चुका दुरुस्त करण्यात येतील, असे सांगत आहेत. ज्या मूलभूत तत्त्वांवर डीपी तयार केला ती बदलण्यात येणार नाहीत, असे या अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे डीपी खरोखरच रद्द केला गेला आहे की केवळ चुकांची दुरुस्ती करून नव्याने मांडण्यात येणार, याबाबत संभ्रम कायम आहे.महाराष्ट्र नगररचना (एमआरटीपी) कायद्याच्या कलम १५४ नुसार राज्य सरकारला असलेल्या अधिकारांचा वापर करीत मुंबईचा विकास आराखडा रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी केली. मात्र प्रत्यक्षात विकास आराखडा रद्द झालेला नसून, त्यामधील काही ठळक चुकांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे नगरविकास विभागातील उच्चपदस्थांचे मत आहे. जहांगीर आर्ट गॅलरी, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा येथे चुकून दाखवलेली आरक्षणे बदलण्यासारख्या चुकांची दुरुस्ती अपेक्षित आहे, असे त्यांचे मत आहे. डीपीमधील मूलभूत तत्त्वे आराखडा दुरुस्ती करताना बदलण्याचा प्रश्न नाही, असे नगरविकास विभागाचे मत आहे. ही मूलभूत तत्त्वे बदलायची झाल्यास संपूर्ण डीपी नव्याने बनवावा लागेल. तशीच मागणी कदाचित शिवसेना लावून धरील आणि फेब्रुवारी २०१७ नंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी हा विकास आराखडा मंजूर होऊन त्याचा राजकीय फटका बसू नये याची काळजी घेतील, अशी चर्चा आहे.ं
डीपी रद्द की चुकांची दुरुस्ती?
By admin | Published: April 23, 2015 5:40 AM