शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

डीपी, रिंगरोड मार्गी लागणार?

By admin | Published: July 18, 2016 1:17 AM

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने जुन्या हद्दीचा विकास आराखडा राज्य शासनाकडे पाठवून अनेक महिने उलटले तरी त्याला शासनाने अद्याप मंजुरी दिलेली नाही

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 18 - विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने जुन्या हद्दीचा विकास आराखडा राज्य शासनाकडे पाठवून अनेक महिने उलटले तरी त्याला शासनाने अद्याप मंजुरी दिलेली नाही, शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्याने भामा आसखेडच्या पाइपलाइनचे काम अद्यापही रखडत सुरू आहे, एमएसआरडीसीमार्फत नव्याने आणखी एक रिंगरोड तयार करण्याची अधिसूचना नगरविकास विभागाने काढल्याने रिंग रोडचा तिढा सुटण्याऐवजी त्याचा घोळ वाढला आहे. त्याचबरोबर कचरा, वाहतूक, पीएमपीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शहराच्या या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांची ठोस सोडवणूक पावसाळी अधिवेशनामध्ये होणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला सोमवार (ता. १८) पासून सुरुवात होत आहे. शहराचे अनेक प्रश्न राज्य शासनाच्या दरबारी प्रलंबित आहेत. या विषयांचा पाठपुरावा सातत्याने शहरातील आमदारांकडून करण्यात येत आहे. पालकमंत्री गिरीश बापट, सामााजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय काळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर हे ८ आमदार शहरातून विधानसभेवर निवडून आले आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, अनिल भोसले प्रतिनिधीत्व करीत आहेत. शहराच्या प्रश्नांसाठी महापौर प्रशांत जगताप यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, मात्र अजूनही ते प्रश्न जैसे थे आहेत. पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांकडून हे प्रश्न लावून धरून त्यावर ठोस कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेने वेळेत पूर्ण केले नाही, म्हणून राज्य शासनाने तो पालिकेच्या ताब्यातून काढून घेतला. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीकडे त्याचे काम सोपविले. या समितीने हा आराखडा पूर्ण करून ६ महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठविला. मात्र शासनाकडून अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही.शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत भामा आसखेड पाइपलाइनचे काम पूर्ण न होऊ देण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पाइपलाइनचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास जेएनयुआरएम अंतर्गत या योजनेसाठी मिळणारे अनुदान न मिळण्याची भीती निर्माण झाली आहे. रिंगरोडचा नवीन घोळ उद्भवला आहे. आदी प्रश्न अधिवेशनात मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. >तारांकित प्रश्न, लक्षवेधीसाठी आमदारांची धडपड : आक्रमक भूमिका हवीशहराच्या प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्यासाठी आमदारांकडून अनेक दिवसांपासून तयारी केली जाते. मात्र अनेकदा वेळेअभावी आमदारांचे हे प्रश्न कामकाजाच्या पटलावर येत नाहीत. आपला प्रश्न, लक्षवेधी सभापतींनी कामकाजात समाविष्ट करून घ्यावी, यासाठी आमदारांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.आमदारांकडून हे प्रश्न लावून धरून त्यावर ठोस कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.