शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
3
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
4
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
5
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
7
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
8
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
9
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
11
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
13
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
14
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
15
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
16
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
17
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
18
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर तयार; प्रवासाचा वेळ येणार तीन तासांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 7:48 AM

प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद आणि हैदराबाद या ११ रेल्वे स्थानकांचा समावेश असणार आहे.

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अखेर बहुचर्चित ७११ किमीच्या मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर तयार झाला असून, तो ‘एनएचआरसीएल’ला अर्थात नॅशनल हायस्पीड  रेल्वे कॉर्पोरेशनला सादर करण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या बुलेट ट्रेनच्या कामास रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार सुरुवात करण्यात येणार  असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद आणि हैदराबाद या ११ रेल्वे स्थानकांचा समावेश असणार आहे. ठाणे जिल्ह्यात ९ किमीचा मार्ग असणार आहे. 

ठाणे जिल्ह्यातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, उसरघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख.) या गावांची जमीन जाणार आहे. मुंबई आणि हैदराबाद प्रवासासाठी १४ तास लागतात; बुलेट ट्रेनने हा प्रवास फक्त तीन तासांत पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रासह तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या विकासात हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. 

प्रति तास ३५० किमी वेग७११ किमीच्या या मार्गावर प्रती तास ३५० किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावेल, असा त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा वेग सरासरी २५० किमी प्रती तास  असेल. रूळ स्टँडर्ड गेजचे असणार असून, एका ट्रेनची प्रवासी क्षमता ७५० असणार आहे.

विमानाद्वारेलिडार सर्वेक्षणगेल्या वर्षी मे महिन्यात ‘मुंबई-पुणे-हैदराबाद’ बुलेट ट्रेनसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सुरुवात झाली होती. सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक ‘एरियल लिडार’ आणि ‘इमेजरी सेन्सर’ने बसवलेल्या विमानाने पाहणी करण्यात आली.

ग्रीन कॉरिडॉरमुळे होताेय विरोधया मार्गात ठाणे, पुणे, सोलापूर जिल्ह्यांच्या ग्रीन कॉरिडॉरमधील वन आणि शेतजमीन बाधित होणार आहे. यामुळे शेतकरी आणि  पर्यावरणवाद्यांकडून त्यास आधीपासूनच विरोध होत आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन