मुंबई : जपानमधील कोयासन विद्यापीठात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. जपानच्या नागरिकांना महाराष्ट्राने दिलेली ही अमूल्य भेट आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.कोयासन विद्यापीठाचा परिसर गजबजून गेला होता. मुख्यमंत्र्यांसह सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र संस्कृतीचे प्रतीक म्हणून उपस्थित पाहुण्यांसह जपानी नेत्यांनीही भगवे फेटे बांधले. या वेळी वाकायामा प्रांताचे गव्हर्नर योशिनोबू निसाका, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रामदास आठवले, खासदार अमर साबळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे आदी उपस्थित होते. कोयासनसारख्या बौद्धसंस्कृतीच्या सर्वाधिक प्राचीन अध्ययन केंद्रात बाबासाहेबांचे स्मारक होणे ही बाब अतिशय गौरवास्पद आहे, असे गव्हर्नर निसाका म्हणाले. तर येथील बुद्धिस्ट सँक्च्युरीचे प्रवर्तक भंते कोबो डायशी यांनी भारतातील बौद्ध परंपरांचा जपानला परिचय करून दिला. दोन विद्यापीठांत करारमुख्यमंत्री फडणवीस आणि वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोसायन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू या वेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेबांचा जपानमध्ये पुतळा !
By admin | Published: September 11, 2015 5:34 AM