शहरं
Join us  
Trending Stories
1
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
2
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
4
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
5
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
6
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
7
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
8
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
9
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
10
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
11
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
12
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
13
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
14
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
15
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
16
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
17
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
18
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
19
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
20
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   

ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. एकनाथ पवार; राज्य शासनाने काढले आदेश 

By संतोष आंधळे | Published: June 20, 2024 6:50 PM

डॉ पवार जे जे रुग्णलायातील ऑर्थोपेडिक विभागप्रमुख पदाचे काम सांभाळून ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार सांभाळणार आहे.

मुंबई :  पुणे येथील ससून रुग्णालयात गैरकृत्याची मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागाने ससून रुग्णालयाचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार बारामती येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे दिला होता. वैद्यकीय शिक्षण विभागाने गुरुवारी डॉ. म्हस्के यांच्याजागी जे जे रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक विभागप्रमुख डॉ एकनाथ पवार यांना ससून रुग्णालयाचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश काढले.  

डॉ. पवार गेली २० वर्षापेक्षा अधिक वर्ष शासकीय सेवेत असून ९ वर्षे ते जे जे मध्ये ऑर्थोथपेडिक विभागात कार्यरत आहेत. काही वर्षांपासून त्यांनी विभाग प्रमुख पद सांभाळले होते. याप्रकरणी डॉ पवार यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की, " शासनाच्या आदेशान्वये मी शुक्रवारी या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे.  या ठिकाणी काम करणे आव्हान असले तरी रुग्णालयातील सर्व  सहकाऱ्याच्या सोबतीने काम करणार आहे. या ठिकाणी खूप करण्याची गरज आहे. आता पदभार स्वीकारल्यानंतर सर्व गोष्टी आढावा घेतल्यानंतर कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा ते निश्चित करणार आहे. "

डॉ. पवार जे. जे. रुग्णलायातील ऑर्थोपेडिक विभागप्रमुख पदाचे काम सांभाळून ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार सांभाळणार आहे.  पुणे येथील कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्तनमुन्यात फेरबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि शिपायास पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने या तिघांना सुद्धा सेवेतून निलंबित केले होते. तसेच रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता  डॉ विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.  त्यानंतर त्या ठिकाणी बारामती येथील शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे ससून रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता.

टॅग्स :sasoon hospitalससून हॉस्पिटलPuneपुणे