पुणे : ‘भाई : आणि व्यक्ती आणि वल्ली’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात गुरुवर्या हिराबाई बडोदेकर यांच्या संबंधात जे काही चित्रण झालेले आहे. ते पाहून अत्यंत वाईट वाटले आणि राग ही आला. केवळ हिराबाईंच्या काळातच नव्हे तर आजही एक आदर्श स्त्री कलाकार म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. अत्यंत शालीन , सौम्य , मृदू पण भारदस्त असं त्यांचं वागणं , बोलणं होतं . मात्र, भाई नुकताच प्रदर्शित झालेल्या भाई या चित्रपटात हिराबाईंच्या व्यक्तिमत्वाला बदनाम आणि घोर अपमानित करणारा असा आहे. या चित्रपटातून हिराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन करण्यात आलेले आहे. असा आरोप ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई : व्यक्ती आणि वल्ली हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळतो आहे. परंतु, प्रभा अत्रे यांनी या चित्रपटात हिराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन करण्यात आले असल्याचा आरोप केला आहे. अत्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातुन हा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या आहेत, पु .ल. देशपांडे , कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी यांच्यापेक्षा जवळपास पंधरा ते वीस वर्षांनी हिराबाई बडोदेकर ह्या मोठ्या आहेत . त्या सगळ्यांना हिराबाई ह्या मातृस्थानी , गुरुस्थानी अशा होत्या. या तिघांनी हिराबाई एकेरी नावाने उल्लेख करावा याचं आश्चर्य वाटतं. तसेच चित्रपटात हिराबाईंची भूमिका साकारणारी स्त्री सम वयाची दाखवली आहे आणि तिचे हावभावही भडक आहेत .
‘भाई’ चित्रपटातून हिराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन : प्रभा अत्रे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:47 PM