शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

डॉ. राजन वेळूकर पुन्हा कुलगुरूपदी

By admin | Published: March 07, 2015 1:59 AM

मुंबई विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा डॉ. राजन वेळूकरांकडे आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अपात्रतेचा ठपका ठेवल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी वेळूकरांना पदावरून दूर केले होते.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा डॉ. राजन वेळूकरांकडे आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अपात्रतेचा ठपका ठेवल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी वेळूकरांना पदावरून दूर केले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या या आदेशालाच सर्वोच्च न्यायालयात स्थगिती दिल्याने वेळूकर यांना पुन्हा एकदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर रुजू होण्याची सूचना राज्यपालांनी केली आहे. डॉ. राजन वेळूकर यांनी मंगळवारी सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या शोध समिती संदर्भातील निर्णयास २७ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर वेळूकर यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन आपली बाजू राज्यपालांपुढे ठेवली होती. मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू ए. डी. सावंत यांनी वेळूकर यांच्या निवडीला एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ११ डिसेंबर २०१४ रोजी या याचिकेवरील सुनावणी करताना न्यायालयाने वेळूकरांना कुलगुरूपदासाठी अपात्र ठरविले होते. तसेच निवड समितीने वेळूकर यांची या पदावर चुकीच्या पद्धतीने निवड केल्याचे ताशेरेही ओढले होते. या निर्णयानंतर राज्यपालांनी वेळूकरांना कुलगुरूपदावरून दूर केले होते. मात्र आता उच्च न्यायालयाच्या निर्णयालाच वेळूकर यांनी सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळविल्याने राज्यपालांनी विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा वेळूकरांकडे सोपविला. तसे पत्रकच राजभवनातून जारी करण्यात आले. (प्रतिनिधी)