बुलडाणा: राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई येथील ब्रिचकॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.ना. राजेंद्र शिंगणे यांना कालपासून काहीसा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सद्या ते मुंबईतील ब्रिचकॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहे. आपली प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सोबतच आपल्या संपर्कात आलेल्यांनीही कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले आहे. दरम्यान ते कोरोना बाधीत झाल्याने मंत्रालयात १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या लोणार व सिंदखेड राजा आणि शेगाव विकास आराखड्याच्या बैठकीसही त्यांना उपस्थित राहता आलेले नाही.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 19:16 IST
Dr. Rajendra Shingane infected with corona मुंबई येथील ब्रिचकॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण
ठळक मुद्देप्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संपर्कात आलेल्यांनीही कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.