मुंबई : राज्य सरकारचा उपक्रम म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन प्रकाशित केले जाते. आतापर्यंत समितीच्या वतीने एकूण २४ खंड प्रकाशित करण्यात आले असून, त्यापैकी दोन खंड मराठी तर उर्वरित खंड इंग्रजीमध्ये आहेत. डॉ. आंबेडकर यांची साहित्य संपदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून या ग्रंथाची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. हे वर्ष डॉ. आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून सरकार साजरे करत आहेत. यानिमित्ताने आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांचे पुनर्मुद्रण आणि नवे ग्रंथ समितीतर्फे प्रकाशित होत आहेत, अशी माहिती समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी दिली. (प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण
By admin | Published: October 09, 2016 2:11 AM