शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रंगारंग कार्यक्रमांनी रंगणार नाट्यसंमेलन!

By admin | Published: April 20, 2017 3:13 AM

उस्मानाबाद येथे २१ ते २३ एप्रिल या कालावधीत रंगणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात, तमाम नाट्यरसिकांना भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

राज चिंचणकर, मुंबईउस्मानाबाद येथे २१ ते २३ एप्रिल या कालावधीत रंगणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात, तमाम नाट्यरसिकांना भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. नाट्यसंमेलन स्थळी उभारलेल्या विविध रंगमंचावर हे कार्यक्रम होणार आहेत. २१ एप्रिल रोजी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. २३ एप्रिल रोजी या संमेलनाचा समारोप आहे. या तीन दिवसांत नाट्यसंमेलन नगरीत विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. २१ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या मुख्य सोहळ्यानंतर रात्री ८.३० वाजता नाट्यसंमेलन नगरीतल्या तुळजाभवानी मुख्य रंगमंचावर पु. ल. देशपांडे लिखित ‘तुझे आहे तुझपाशी’ हे नाटक सादर होणार आहे. त्यापूर्वी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात, ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘षडयंत्र’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.२२ एप्रिल रोजी रा. प. परमहंस महाविद्यालयातील रंगमंचावर सकाळी १० वाजल्यापासून एकपात्री महोत्सव होईल. रात्री ९ वाजता अंबाजोगाई शाखेतर्फे ‘गोंधळ’ व ‘लळित’ या लोककला सादर होणार आहे. या दिवशी सकाळी १० ते १ या वेळेत श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथील मुख्य रंगमंचावर स्थानिक कलाकार लोककला सादर करतील. तर सायंकाळी ६ वाजता अभिनेत्री पद्मश्री कदम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘खुमखुमी’ हा नाट्यप्रयोग होईल. रात्री ८ वाजता ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विविध एकांकिका सादर होतील. यात नाट्यपरिषदेच्या सोलापूर उपनगर शाखेची ‘हमसफर’, बीड शाखेची ‘उचल’, सोलापूर उपनगर शाखेची ‘दर्द कोरा’, ठाणे शाखेची ‘अशी मी, अशी मी’, नाशिक शाखेची ‘स्किट’ आदी एकांकिकांचा समावेश आहे. याच रंगमंचावर सायंकाळी ५ वाजता, नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांची प्रकट मुलाखत होईल. त्यानंतर, नाट्यपरिषदेच्या कल्याण शाखेतर्फे ‘विनोदी प्रहसन’, तसेच ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भिडे यांचा ‘अंधारातील स्वगत’ हा नाट्यप्रयोग रंगणार आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे, २३ एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथील मुख्य रंगमंचासह, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि रा. प. परमहंस महाविद्यालयातील रंगमंचावर स्थानिक कलाकार लोककला सादर करतील. सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुलावरील मुख्य रंगमंचावर खुले अधिवेशन आणि नाट्यसंमेलनाचा समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.