शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

नाटक हे पवित्र व्यसन!

By admin | Published: February 20, 2016 3:21 AM

नाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी म्हणायचे की, दारू ही प्यायच्या अगोदर सुटते! त्यानंतर त्याची सुटका नाही.

96 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश

नाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी म्हणायचे की, दारू ही प्यायच्या अगोदर सुटते! त्यानंतर त्याची सुटका नाही. आमचा नाटक धंदासुद्धा असाच आहे. या धंद्यात एकदा का माणूस उतरला की रंगभूमीकडे त्याची पावले वळणारच. हे व्यसन आहे, एक पवित्र व्यसन...या नगरीत ठाण्याची शान असलेल्या दादोजी कोंडदेव मैदानात हे नाट्यसंमेलन भरत आहे हे भाग्यच. या ठाणे नगरीत भरलेल्या पहिल्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली. हे माझे परमभाग्यच! नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा कालावधी फक्त एका वर्षापुरता मर्यादित आहे. पण मनात आणलं आणि निश्चय केला तर अनेक गोष्टी करता येतील. त्याची सुरुवात बालरंगभूमीपासूनच करायला हवी. बालरंगभूमी बाळसेदार होण्यासाठी पहिल्या इयत्तेपासूनच नाट्यविषय हा समाविष्ट करून घ्यायला हवा. मुलांना नाट्यविषय शिकविण्यासाठी शाळेतील शिक्षकांनाच नाट्यविषयाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. नाट्यलेखनसुद्धा शिक्षकांनीच करायला हवं. बालरंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी यांचा विचार केला तर प्रायोगिक रंगभूमी अधिक सक्षम होत असल्याचं जाणवतंय. त्याला कारण महाराष्ट्र राज्य गेली पच्चावन्न वर्षे राज्य स्तरावर घेत असलेल्या नाट्यस्पर्धा. पूर्वीच्या काळात संस्थानिक / राजे कलावंतांना राजाश्रय द्यायचे. त्याच धर्तीवर लोकप्रतिनिधींनी भरघोस रकमेच्या बक्षिसांच्या नाट्यस्पर्धा भरवाव्यात. आयपीएलच्या पद्धतीने लोकप्रतिनिधींमध्येच नाट्यस्पर्धा व्हावी. पहिल्या क्रमांकावर आलेलं नाटक हे खासदार महाशयांनी दत्तक घ्यावं आणि त्या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करावेत. अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र शासनाला आणि नाट्य परिषदेला मला कळकळीची विनंती करावीशी वाटते की, त्यांनी विविध बोलीभाषेतील लेखकांना त्यांच्या बोलीभाषेतील नाटक लिहायला भाग पाडून वर्षभराच्या आत बोलीभाषेतील नाटकांच्या स्पर्धेचं आयोजन करावं. त्याचं पालकत्व नाट्य परिषदेनं घ्यावं आणि महाराष्ट्रभरात प्रयोग करावेत. एकेकाळी सुवर्णयुग असलेल्या संगीत रंगभूमीचे चित्र अत्यंत निराशाजनक आहे. शासनाकडून संगीत नाटकांची स्पर्धा होते. त्यात जुनीच नाटकं सादर केली जातात. नवीन असं काही सापडतच नाही. २००६ साली नांदेड येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात नाट्य परिषदेने एकपात्री प्रयोग करणाऱ्या कलावंतांना संमेलनात स्वत:चं व्यासपीठ तर मिळवून दिलंच; शिवाय वर्षातून एका कलावंताला संमेलनातच पुरस्कार देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला. नाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी म्हणायचे की, दारू ही प्यायच्या अगोदर सुटते. त्याच्यानंतर त्याची सुटका नाही. आमचा नाटक धंदासुद्धा असाच आहे. या धंद्यात एकदा का माणूस उतरला की मग तो तोडाला रंग लावलेला रंगकर्मी असो की नाट्य व्यवस्थापक, निर्माता असो, रंगभूमीकडे त्यांची पावले वळणारच. या घडीला नाटक धंदा कितीही तोट्यात असला तरी वर्तमानपत्राची पानं उघडली की दोन दोन पानांवर नाटकांच्या एकापेक्षा एक देखण्या जाहिराती दिसतात. धंदा तोट्याचा मग जाहिराती कशा? यालाच म्हणतात नाट्यव्यसन. हेही व्यसन असले तरी ते पवित्र व्यसन आहे, अशी माझी भावना आहे. एका महत्त्वाच्या बदलाचे स्वागत आज मुद्दाम करावेसे वाटते. पूर्वी नाट्यनिर्मितीची पालखी ही पुरुषच वाहून नेत होते. पण बदलत्या काळात आता पुरुषांच्या बरोबरीने अनेक महिला निर्मात्याही सक्रिय आहेत, ही एक अभिमानाची घटना म्हणावी लागेल. नाटकाचा खर्च कमी करायचा असेल तर सांस्कृतिक खात्याने आमच्या निर्मात्यांना नाटकाच्या तालमींना अल्पदरात परवडेल अशा जागा उपलब्ध करून द्याव्यात. उड्डाणपुलाखालील ज्या रिकाम्या जागा आहेत तेथे नाट्य निर्मात्यांच्या गाड्या उभ्या राहण्यासाठी जागा आरक्षित ठेवावी आणि अशाच रिकाम्या जागेत नाटकांचे सेट ठेवण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था करावी. म्हणजे खाजगी आणि महानगरपालिका यांच्या अखत्यारीत असलेल्या नाट्यगृहांची भाडी कमी करता येतील. चर्चेअंती यावर तोडगा काढावा, काही शाळांमधून शाळेच्या कारभारात व्यत्यय न आणता तेथे नाटकांच्या तालमींसाठी अल्पदरात जागा उपलब्ध करून देता येईल का? याचा शाळांच्या संचालकांशी चर्चा करून विचार करावा. पडद्यामागील कलावंतांच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षे अनुत्तरित आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुंबईपासून जवळच म्हणजे पनवेलच्या आसपास एखादा भूखंड कलावंतांच्या सदनिकांसाठी उपलब्ध करून द्यावा. ज्या मराठी संस्था, शाळा वगैरे रंगभूमीविषयक उपक्रम राबवतात किंंवा इतरांच्या उपक्रमात, स्पर्धेत सहभाग घेतात त्यांनाही शासनाने अनुदान द्यावे.राज्य सरकारने, नाट्य परिषेदेने त्यादृष्टीने संमेलनाध्यक्षांच्या ‘भटकंतीस’ सुसह्य होईल अशी व्यवस्था करावी. हे अखिल भारतीय स्तरावरले पद असल्याचे भान मला आहे. आता कक्षा रुंदावल्या पाहिजेत. देशभरातील नाट्यचळवळींशी कुठेतरी संवाद साधला जावा, ही अपेक्षा आहे. त्यादृष्टीने साऱ्यांचे सहकार्य मिळावे.अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची वैभवशाली परंपरा आहे, जी उभ्या जगात कुठेही दिसत नाही. केवळ दोन महिने शिल्लक असताना ठाणेकरांना संमेलन भरविण्याचे आमंत्रण मिळाले. पण कुठलेही आव्हान पेलण्याची क्षमता ठाणेकरांमध्ये असल्यामुळे हे आव्हान स्वीकारून देदीप्यमान, न भूतो.. अशी तयारी केलेली आहे. झपाट्याने बदलत आणि बहरत असलेली सांस्कृतिक नगरी म्हणजे ठाणे! आज जेथे नाट्यसंमेलन भरत आहे त्याजवळच दिवा परिसरात काही वर्षे मी वास्तव्याला होतो. ‘वस्त्रहरण’, ‘वात्रट मेले’ या माझ्या दोन्ही नाटकांचा जन्म हा इथलाच. तेव्हापासून या शहराशी माझं नातं गच्च जुळलं गेलं. आज तसा मी मुंबईकर असलो तरी या ठाण्यातच अधिक रमतो.ही नगरी एकेकाळी तलावांची नगरी म्हणून ओळखली जात होती. आज तिला महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी अशी नवी ओळख मिळाली आहे. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक तरुणांची संख्या ही इथेच आहे. पूर्वी संस्थानिकांच्या काळात इथेच नाट्यकलेला राजाश्रय मिळाला.