शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

नाट्यसंमेलन अध्यक्ष आता दोन वर्षांसाठी?

By admin | Published: February 21, 2016 3:43 AM

नाट्यसंमेलनाध्यक्षांना दोन वर्षांचा कालावधी मिळावा, या मागणीची चर्चा रविवारी नाट्य परिषदेच्या नियामक समितीच्या सभेत होण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मतानुसार हा निर्णय घेण्यासाठी घटनेत

-  महेंद्र सुके, हिंदुहृदयसम्राट , बाळासाहेब ठाकरेनगरी (ठाणे) नाट्यसंमेलनाध्यक्षांना दोन वर्षांचा कालावधी मिळावा, या मागणीची चर्चा रविवारी नाट्य परिषदेच्या नियामक समितीच्या सभेत होण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मतानुसार हा निर्णय घेण्यासाठी घटनेत असलेल्या तरतुदीची अडचण येऊ शकते.शुक्रवारी उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्षांना एक वर्षाचा कालावधी अपुरा पडतो, तो किमान दोन वर्षांचा असावा, अशी मागणी करण्यात आली होती. घटनेतील तरतुदीनुसार दोन वर्षांसाठी अध्यक्ष नेमता येत नाही, मात्र या वर्षी झालेले अध्यक्ष पुढच्या वर्षीचे अध्यक्ष असणार नाहीत, अशीही अट नाही, असे नाट्य परिषदेच्या घटनेचे अभ्यासक आणि घटना दुरुस्तीचे अध्यक्ष गुरुनाथ दळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रविवारी सकाळी १०.३० वाजता नियामक समितीची सभा दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर - पॅव्हेलियनमध्ये होणार आहे. या समितीत खुल्या अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या ठरावांवर चर्चा होणार आहे. त्यात दोन वर्षांच्या बहुमानाविषयीचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. मात्र, संमेलनाध्यक्षही या सभेला उपस्थित राहणार असल्याने घटनेतील तरतुदीचा मुद्दा समोर करून या विषयावर चर्चा करणे टाळणार, याविषयीची चर्चा नाट्यसंमेलनस्थळी शनिवारी रंगली होती.आज सांगता नाट्यसंमेलनाचा सांगता सोहळा रविवारी सायंकाळी ५ वाजता गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये होणाऱ्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सुरेश प्रभू, राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.