मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येमुळे लोकलचा प्रवास असह्य होत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते. गेल्या सहा वर्षांत वाढीव लोकल फेऱ्यांची माहिती घेतल्यास फक्त ८७ फेऱ्याच वाढल्याचे समोर आले आहे. सध्या तरी आणखी लोकल फेऱ्या वाढवणे अशक्य असून त्या वाढवल्यास लोकलच्या वक्तशीरपणावरही परिणाम होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे मध्य रेल्वेला प्रवासी भार अधिक सहन करावा लागणार आहे.नऊ डब्यांच्या लोकल १२ व १२ डब्यांच्या लोकल १५ डबा करणे, तसेच ठाणे ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करता अन्य कोणतेही मोठे प्रकल्प मध्य रेल्वेवर झालेले नाहीत. या कामांमुळे लोकलचा प्रवास थोडाफार सुसह्य होईल, अशी आशा होतील. परंतु तसे होताना दिसले नाही. उलट प्रवासी संख्या वाढतच जात असल्याने प्रवास करणेही जिकिरीचे होत आहे. त्यामुळे लोकल सुटण्याच्या वेळेत बदल करणे, थांबे वाढवणे इत्यादी नियोजनही रेल्वेकडून केले जात आहे. यात रेल्वेकडून लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन मात्र मोठ्या प्रमाणात केले जात नाही.- वाढीव फेऱ्यांच्या तुलनेत प्रवासी संख्या पाहिल्यास वाढीव फेऱ्यांची संख्या अल्पच आहे. २0१0-११ मध्ये दररोज ३८ लाख ३५ हजार प्रवासी लोकलमधून प्रवास करत होते. हाच आकडा आता ४१ लाख ४ हजार एवढा झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वाधिक वाढीव फेऱ्यांचा लाभ हा मध्य रेल्वेच्या मेन लाइनला मिळाला. हार्बर आणि ट्रान्स हार्बर दुर्लक्षितच राहिले.- जास्तीत जास्त लोकल फेऱ्या वाढवणे कठीण असल्याचे मत रेल्वेचे अधिकारी व्यक्त करतात. पश्चिम रेल्वे १,३00 लोकल फेऱ्या चालवत असून मध्य रेल्वे जवळपास १,६६0 पेक्षा जास्त फेऱ्या दिवसभरात चालवते. त्यातच उपनगरीय मार्गांवर मेल-एक्स्प्रेस धावतात. त्यामुळे फेऱ्या वाढवल्यास त्याचे नियोजन करताना बरीच धावपळ रेल्वे प्रशासनाची उडेल. त्याच्या वक्तशीरपणावरही हळूहळू परिणाम होऊ शकतो.- मध्य रेल्वेवर सध्या १२२ लोकलच्या १,६६0 फेऱ्या दिवसभरात होतात. - २0११ मध्ये याच फेऱ्या १ हजार ५७३ एवढ्या होत्या.- २0११ ते २0१६ पर्यंत पाहिल्यास फक्त ८७ फेऱ्याच वाढल्या आहेत.२0१0-११ पासून हार्बर मार्गावर १0 फेऱ्यांची भर पडली.ट्रान्स हार्बर मार्गावर २४ फेऱ्याच वाढल्या.तर मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर सर्वाधिक ५३ फेऱ्याच वाढल्या. मेन लाइनवर वाढलेल्या फेऱ्यांमध्ये कुर्ला ते कल्याण, बदलापूर, आसनगाव, कर्जत, टिटवाळाचा समावेश आहे.प्रवासी व फेऱ्यावर्षफेऱ्याप्रवासी २0१0-१११,७५३३८,३५,३४२२0११-१२१,५७८३९,२५,४७९२0१२-१३१,५९६३९,६३,९७३२0१३-१४१,६१८४0,२३,0१४२0१४-१५१,६४0४0,४९,३१५२0१५-१६१,६६0४0,३५,८४९२0१६-१७१,६६0४१,0४,३२२
लोकलच्या फेऱ्या वाढणे स्वप्नच
By admin | Published: December 27, 2016 2:07 AM