पंकज रोडेकर,
ठाणे- अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर गुलबर्ग्याच्या मुस्ताक अहमद शेख (५५) यांची पत्नी घटस्फोट घेऊन मुलाला घेऊन निघून गेली. याचदरम्यान, त्यांच्या मुलाचे लग्न मुंब्रा येथे होणार असल्याची बातमी कानांवर आली. मुलाच्या लग्नाचा सोहळा पाहण्यासाठी अर्धांगवायू झाल्यानंतरही त्यांनी मोठ्या हिमतीने कोणतीही माहिती नसतानाही गुलबर्गा येथून मुंब्रा गाठले. मुंब्य्रात आल्यावर शोध घेऊनही शोध न लागल्याने त्यांचे लग्न सोहळा पाहण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. याचदरम्यान, ते आजारी पडल्याने ठाणे पोलिसांनी बेवारस म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर योग्य उपचार झाल्यावर तेथील मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शेख पुन्हा घरी परतले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रु ग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रु ग्णासोबत जिव्हाळ्याचे नाते जोपासले जात असल्याचे दर्शन पाहण्यास मिळाले. १२ जुलै २०१६ रोजी ठाण्यातील सेंट्रल मैदान येथे बेवारस अवस्थेत मुस्ताक शेख यांना ठाणेनगर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांना अर्धांगवायूच्या झटक्यासह गॅस्ट्रो, अतिसार आणि लूजमोशन (हगवण) असे आजार झाल्याचे या वेळी केलेल्या तपासणीत पुढे आले. या वेळी अशक्तपणा आणि अर्गांधवायूच्या झटक्याने त्यांना स्पष्ट बोलण्यास त्रास होता. पण, ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. >लग्नासाठी कोणालाही न सांगता ठाण्यातठाण्यात आल्यावर मुस्ताक यांच्या ठाण्यात येण्याचे कारण पुढे आले. तसेच ते १४ वर्षांपूर्वी सौदीत नोकरीला असताना, त्यांना आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्यानंतर त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. तेव्हापासून ते गुलबर्ग्यात आपल्यासोबत राहत असल्याचे त्यांनी सांगितले. याचदरम्यान त्यांना मुंब्रा येथे त्यांच्या मुलाचे लग्न असल्याची माहिती समजली. त्यामुळे त्यांनी त्याचे लग्न पाहायची इच्छा आपल्याकडे केल्याचे बेगम यांनी रुग्णालय प्रशासनास सांगितले. पण, ते कोणालाही काही न सांगता स्वत:हून घरातून निघून आले.शेख यांनी मुंब्य्रात आल्यावर मुलाचा शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. तेथून ठाण्यातील सेंट्रल मैदान येथे आले. तेथे आल्यावर आजारी पडल्याचे त्यांनी सांगितले. >पुन्हा गुलबर्ग्याला रवानगीहे यश पाहून त्यांनी शेख यांच्याकडे नातेवाइकांची विचारपूस केल्यावर त्यांनी मुनी बेगम शेख असे एका महिलेचे नाव सांगितले. ते नाव त्यांच्या बहिणीचे असल्याचे समोर आल्यावर त्यांना शेख यांच्याबद्दल माहिती देऊन त्यांना ठाण्यात बोलवून घेतले.शेख यांचे जुने व आताचे फोटो, रेशनिंगकार्ड आदी कागदपत्रांची पडताळणी केल्यावर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक केम्पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्यांनी मुस्ताक यांना त्यांच्या बहिणीच्या स्वाधीन केले. त्यानंतर, ते गुलबर्ग्याला रवानाही झाल्याचे सिद म्हणाले.