- अतुल कुलकर्णी
नव्या सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला. श्रद्धांजली, काँग्रेसचा मोर्चा, सभागृह बंद पाडणो, 7क् सभासदांचे दुष्काळावरील भाषण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतक:यांना दाखवलेले पंचवार्षिक स्वप्न आणि पोलीस अधिका:यांना जनतेचे मित्र होण्याचा दिलेला सल्ला यात पहिला आठवडा संपला.
बाकी वेळात मंत्र्यांच्या दालनात डबा पाटर्य़ा रंगल्या. रात्री सावजी भोजन खाऊन सगळे तृप्त झाले आणि शनिवार, रविवार मुंबईला निघून गेले. विदर्भातल्या जनतेचे तुम्ही काही देणो लागता, गुलाबी थंडीचा आनंद घेण्याऐवजी विदर्भवासीयांना काहीतरी ठोस देण्याची भावना ठेवून येथे या.. अशी भाषणो विरोधी बाकावरून गेल्या दहा वर्षात अनेकदा ऐकली. अशी भाषणो करणारी मंडळी सत्ताधारी बाकावर आली तरीही या सगळ्यात फरक पडलेला नाही.
अधिवेशनाच्या दोन दिवस आधी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि मंत्री नागपुरात आले. त्यांच्याकडे पीए, पीएस नाहीत, स्वत:चा स्टाफ म्हणावा तेवढा नाही, जो आहे तो खासगी लोकांचा भरणा आहे. ज्या सदस्यांनी अधिवेशनासाठी प्रश्न विचारले होते तेच आता मंत्री झाले आणि स्वत:च विचारलेले प्रश्न कसे चुकीचे आहेत हे सभागृहाला पटवून देऊ लागले.. अनेकांना अजून त्यांच्याच विभागाची पुरेशी ओळख नाही तेथे राज्याचे प्रश्न कसे समजणार आणि त्याची उकल कधी होणार?
सरकार अस्तित्वात आहे असे वाटण्याइतपत कमांड अजून कोणालाही आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत सुंदर, सस्ती, टिकाऊ स्वप्ने दाखवली आहेत. वास्तव मात्र विदारक आहे. सावकारांचे कर्ज माफ करण्याची घोषणा झाली पण त्यातले शेतकरी किती हेच अधिका:यांना माहिती नाही. पाच वर्षानी राज्य दुष्काळमुक्त करण्याचे सुंदर स्वप्नचित्र उभे राहिले आहे पण त्यातले रंग जुनेच आहेत. एकही नवा आणि आकर्षक रंग त्यात नाही. आघाडी सरकार बजेटमधल्या योजना एकत्र करून पॅकेज दिल्याचे भासवत होते. या सरकारने केंद्र आणि राज्याच्या पाच वर्षाच्या योजना आणि बजेट एकत्र करून 34 हजार कोटींचे स्वप्नचित्र बनवले आहे.
बाबू लोकच सरकार चालवतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना विभागाच्या योजना, एसआरएच्या गोष्टी एक आयएएस अधिकारी समजावून सांगत होते. बिल्डर एसआरए योजना घेतात. झोपडीधारकांना आपापसात झुंजवत ठेवण्यात काही वर्षे घालवतात, दहा वर्षानी योजनेचा सांगाडा उभा राहू लागेर्पयत काही झोपडीधारक परागंदा झालेले असतात तर काहींना बिल्डर पळवून लावतात, या काळात जागेच्या भावात कमालीची वाढ होते. मग हेच बिल्डर त्या जागेतून करोडोंची मलाई लाटतात.. हे वास्तव मेहतांना माहिती नाही अशातला भाग नाही. मात्र तो अधिकारी यातले काहीही सांगत नव्हता. म्हाडा आणि एसआरएमध्ये काम करणारे अनेक अधिकारी नोकरी सोडून बिल्डर कसे झाले, हेही त्या अधिका:याने सांगितले नाही.
हे एक उदाहरण झाले. प्रत्येक खात्यात थोडय़ाफार फरकाने हेच चित्र आहे. अधिकारी त्यांच्या सोयीचे चित्र मंत्र्यांपुढे उभे करत आहेत आणि ते तपासण्याची यंत्रणा मंत्री कार्यालयात नाही. त्या त्या पोस्टची, खात्याची अशी एक ‘इन्स्टिटय़ूशनल मेमरी’ असते. ती जपण्याचे काम आपल्याकडे कोणी कधीच केले नाही. नव्या आदेशाने जुने पीए, पीएस परागंदा झाले. काहींनी हट्टाने आपल्या कार्यालयात जुने पीए, पीएस घेतले पण त्यांच्या ऑर्डरच निघत नसल्याने तेही अस्वस्थ आहेत. आंध्रात नवे सरकार आले की जुने अधिकारी स्वत:हून सोडून जातात. तेच चित्र निर्माण करण्याचे काम जुने पीए, पीएस घेऊ नयेत यासाठी काढलेल्या जीआरने केले आहे. आदेश न काढतादेखील हे होऊ शकले असते. मात्र अशा गोष्टी रेकॉर्डवर आणल्या की त्याचा इतिहास होतो आणि असा इतिहास कधीही फारसा चांगला नसतो. इतिहासाची पुनरावृत्ती न करता त्यातले दोष लक्षात घेऊन पुढे जायचे असते एवढेच लक्षात ठेवले तरी वातावरण गढूळ होण्यापासून वाचेल.
एक जुनी गोष्ट आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना सांगलीच्या दौ:यावर गेले होते. विश्रमगृहावर सकाळपासून बैठका चालू होत्या. दुपारी तीन-चार वाजता अधिकारी सांगत आले की, साहेब, सकाळपासून काही शेतकरी बाहेर बसले आहेत, आपल्याला भेटल्याशिवाय जायचे नाव घेत नाहीत. दादा उठले. आधीच का सांगितले नाही म्हणून अधिका:यांवर डाफरले. स्वत: त्या शेतक:यांकडे गेले. त्यांच्याजवळ जमिनीवर मांडी घालून बसले. एक फोटोग्राफर पळत आला तेव्हा ते म्हणाले, ‘‘हा फोटो काढ आणि छाप.. माझं सरकार शेतक:यांच्या पायाशी बसलंय.. अधिकारीदेखील त्यातून काय समजायचं ते समजतील..’’ वसंतदादांच्या या एका कृतीने त्या वेळी चित्र बदलले. वरिष्ठ नेत्यांनी मेसेज असा द्यायचा असतो. अंतुलेंनी रात्रभर मंत्रलय जागे ठेवून एका अंध शिक्षकाला घर मिळवून दिले होते. सरकार असे काम ज्या वेळी करू लागेल त्या दिवशी कोणत्याही पॅकेजची गरज उरणार नाही.
आघाडी सरकारने चुका केल्या म्हणूनच लोकांनी नवे सरकार सत्तेत आणले आहे. गेल्या पाच दिवसांत पन्नास वेळा जुन्या सरकारने केलेल्या चुकांचा पाढा वाचला गेला. हे सरकार त्यांच्याच चुका सांगण्यात वेळ घालवू लागले तर जनतेच्या पदरी निराशा येईल. नव्याची नवलाई संपण्यास वेळ लागणार नाही. लोकांना रिझल्ट पाहिजे. भाषणांनी पोटाची खळगी आणि घशाची कोरड थांबणारी नाही.
विदर्भातल्या जनतेचे तुम्ही काही देणो लागता, गुलाबी थंडीचा आनंद घेण्याऐवजी विदर्भवासीयांना काही तरी ठोस देण्याची भावना ठेवून येथे या.. अशी भाषणो विरोधी बाकांवरून गेल्या दहा वर्षात अनेकदा ऐकली. अशी भाषणो करणारी मंडळी सत्ताधारी बाकावर आली तरीही या सगळ्यात फरक पडलेला नाही. सरकार अस्तित्वात आहे असे वाटण्याइतपत कमांड अजून कोणालाही आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत सुंदर, सस्ती, टिकाऊ स्वप्ने दाखवली आहेत. वास्तव मात्र विदारक आहे.