नामदेव मोरे - नवी मुंबई
भाजपाने दाखविलेल्या चांगल्या दिवसांचे स्वप्न भंगले आहे. मागील तीन महिन्यांत फ्लॉवर चार पट, कोबी तीन पट तर कांद्यासह इतर प्रमुख भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. वाढत्या महागाईमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
महागाई कमी होणार, सर्वाना चांगले दिवस येणार, असे आश्वासन देऊन भाजपाने केंद्रात एकहाती सत्ता मिळविली. परंतु प्रत्यक्षात मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडू लागल्या आहेत. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी स्थिर असणारे बाजारभाव मागील तीन महिन्यांत मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. मार्चमध्ये मुंबई बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये प्रति किलो 3 ते 5 रुपये किमतीला विकला जाणारा फ्लॉवर आता 14 ते 18 रुपयांवर गेला आहे. कोबी प्रति किलो 3 ते 5 वरून 1क् ते 14 वर गेली आहे. कांदा 7 ते 11 वरून 14 ते 21 वर गेला आहे. घेवडा, टोमॅटो, वांगी, कोथिंबीर सर्वाचेच दर मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये भाव कित्येक पटीने जास्त आहेत. पाव किलो भाजीसाठी 15 ते 2क् रुपये मोजावे लागतात. कांद्याचे नवीन पीक बाजारात येण्यासाठी अजून तीन महिने अवकाश आहे. शासनाने योग्य उपाय केले नाही तर दर भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजीपाल्याचे दरही आहे तसेच राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.
तीन महिन्यांमधील भाजीपाल्याच्या बाजारभावाची माहिती
वस्तू 22 मार्च23 जूनकिरकोळ
कांदा7 ते 1114 ते 2125 ते 28
फ्लॉवर3 ते 514 ते 1855 ते 6क्
कोबी3 ते 51क् ते 144क्
दुधी भोपळा6 ते 1216 ते 184क्
घेवडा2क् ते 244क् ते 447क् ते 8क्
शेवगा शेंग14 ते 2636 ते 5क्8क् ते 1क्क्
वांगी4 ते 1216 ते 3क्4क् ते 48
फरसबी3क् ते 4क् 6क् ते 758क् ते 9क्
गवार3क् ते 4क् 3क् ते 5क्6क् ते 72
बटाटा11 ते 1415 ते 1925 ते 28
कांदा सरकारच्या
डोळ्यांतूनही पाणी काढणार
कांद्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हे दर 28 वर गेले आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता व्यापा:यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी कांद्याच्या दरामुळे दिल्लीत भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. अद्याप तेथे पुन्हा सत्ता मिळविता आलेली नाही. दरवाढ रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर कांदा आता ग्राहकांना रडवतोय; आणि अशीच स्थिती राहिली तर सरकारच्या डोळ्यांतूनही पाणी काढेल, अशी प्रतिक्रिया काही व्यापा:यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.