शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

वैद्यकीय परीक्षांसाठीही ड्रेसकोड, धार्मिक पेहरावाला सवलत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 1:45 PM

नीट प्रमाणेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाºया विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड असणार आहे.

ठळक मुद्देआरोग्य विज्ञान विद्यापीठ : येत्या परीक्षेपासून अंमलबजावणी अर्ध्या बाहीचा व फिक्या रंगाचा शर्ट किंवा टी शर्ट, फुल पॅन्ट, चप्पल असा ड्रेसकोडघड्याळे, ब्लुटूथ डिव्हाइस अशा विविध माध्यमातून विद्यार्थी कॉपी करण्याचे प्रकार

पुणे : नीट प्रमाणेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाºया विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड असणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना अर्ध्या बाहीचा व फिक्या रंगाचा शर्ट किंवा टी शर्ट, फुल पॅन्ट, चप्पल असा ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. यातून धार्मिक व परंपरेशी संबंधित पेहरावाला सवलत देण्यात आली आहे. दि. २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी हा ड्रेसकोड लागु होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई)ने नीट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रेसकोड निश्चित केलेला आहे. त्याचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. हीच पध्दत आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्वीकारली आहे. विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच एखाद्या विद्यापीठाने अशाप्रकारे ड्रेसकोड ठरविला आहे.विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा दि. २७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. या परीक्षांपासून ड्रेसकोडच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. याविषयी माहिती देताना कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, विद्यापीठाच्या परीक्षा घेताना विविध केंद्रांवर अनेक अडचणी येतात. घड्याळे, ब्लुटूथ डिव्हाइस अशा विविध माध्यमातून विद्यार्थी कॉपी करतात. त्यामुळे तज्ज्ञांनी याबाबतची नियमावली तयार केली. त्यासाठी नीटची पध्दत अवलंबण्यात आली आहे. त्यानुसार पेहरावाबाबत नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांची अंमलबजावणी येत्या परीक्षेपासून सुरू केली जाणार आहे. त्यानंतर होणाºया प्रत्येक परीक्षेला हीच नियमावली असेल. -----------------असा असेल ड्रेसकोड- अर्ध्या बाहीचे, फिक्या रंगाचे शर्ट किंवा टी-शर्ट आणि फुल पॅन्ट. मुलींना यासह साडी किंवा सलवार कमीजही चालेल.- शर्टला छोटे बटन असावे. नक्षीदार बटन नसावे. - अंगठी, गळ्यातील साखळी यांसह कुठल्याही प्रकारचे दागिने (मंगळसुत्र वगळून) घातला येणार नाही. - घड्याळ, मोबाईल किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नसावे.- अप्रन, टोपी, गॉगल, पर्स, हार, चेन, पीन, हँड बॅग आदी वस्तु वापरता येणार नाहीत.- पायात चप्पल/स्लीपर असावी. बुट नसावेत.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थी