पिंपरी : दीर्घ प्रतीक्षेनंतर घोडं एकदाचं न्हालं अन् उमेदवारी मिळालेल्यांकडून झपाझप कामे येऊन आदळल्याने शहरातील प्रचारसाहित्य विकणारांची एकच लगबग सुरु झाली आहे. आपापल्या पक्षचिन्हांचे ङोंडे फडकविण्यासह चेह:यांचे मुखवटे तयार करुन घेण्याच्या उमेदवारांच्या कामांमुळे आता विक्रेत्यांना फुरसतच उरली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र प्रचारसाहित्य कारागिरांकडून करवून घेण्यापेक्षा थेट शहराबाहेरील उत्पादक कंपन्यांकडून खरेदीस उमेदवार पसंती देत असल्याने स्थानिक कारागिरांच्या रोजगारावर संक्रांत आल्याचे चित्र आहे.
बहुतेक निवडणुकांमध्ये अर्ज दाखल करण्याच्या दहा ते पंधरा दिवसांआधीच उमेदवारी जाहीर होत असल्याचा कारागिरांचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे वेळेचा कारागिरांच्या उपलब्धतेशी मेळ घालून नियोजित पद्धतीने काम चालायचे. मात्र या वर्षी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधीर्पयत कोणत्याच पक्षाच्या जागावाटपाचा तिढा न सुटल्याने उमेदवारच टांगणीला लागले होते. मात्र प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात उतरल्याने साहजीकच उमेदवारसंख्या तुलनेने वाढली आहे. त्यांच्याकडून उशीराने व कमी प्रमाणात का होइनात, पण प्रचार साहित्याची मागणी होत आहे.
विक्रेत्यांकडे विविध पक्षांचे ङोंडे, पताका, पक्षचिन्हांची उपरणी, उमेदवारांनी मागणी केल्यानुसार त्यांची छायाचित्र व निवडणूक चिन्हे असलेले धातू व प्लॅस्टिकचे बिल्ले विक्रीस उपलब्ध होत आहेत. आकार व कामाच्या दर्जानुसार पक्षाचे ङोंडे 1क् ते 5क् रुपयांर्पयत उपलब्ध आहे. उपरणी 1क् ते 3क् रुपयांना, स्टिकर्स 3 ते 8 रुपयांना मिळत आहेत. (प्रतिनिधी)