शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

दूध हे औषधाप्रमाणे प्यावे

By admin | Published: June 12, 2017 1:45 AM

दूध हे औषधाप्रमाणे प्यायले पाहिजे. कारण श्वेत क्रांती झाल्यापासून दुधाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. मशीनद्वारे दूध काढताना त्यात गाईचे रक्तदेखील मिश्रित होत असते

लोकमत न्यूज नेटवर्कबिबवेवाडी : दूध हे औषधाप्रमाणे प्यायले पाहिजे. कारण श्वेत क्रांती झाल्यापासून दुधाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. मशीनद्वारे दूध काढताना त्यात गाईचे रक्तदेखील मिश्रित होत असते, असे मत प. पू. लब्दीचंद्रजी म. सा. यांनी व्यक्त केले. शाकाहार या विषयावर बोलण्यासाठी सर्व धर्माच्या गुरूंची बैठक मार्केट यार्ड येथील कुमार सिद्धाचल सोसायटी येथे हॅप्पी अ‍ॅनिमल्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते.या वेळी साधू वासवानी मिशनच्या अरुणा जेठवानी यांनी सांगितले, की २५ नोव्हेंबर हा साधू वासवानी यांचा जन्मदिवस असतो. हा दिवस जागतिक शाकाहार दिवस म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाचे आयोजक हॅप्पी अ‍ॅनिमल्स असोसिएशनचे मनोज ओसवाल म्हणाले, की शाकाहार आमच्या कामाचा मुख्य आधार आहे. प्राणिप्रेम हे आता मुख्य प्रवाहाचा भाग बनले आहे. शाकाहार एक विशिष्ट धर्माचा नसून सगळ्याच धर्मांतील लोक शाकाहारी होऊ शकतात. मुस्लिम विंग संस्थेचे अल्ताफ हुसैन म्हणाले, की मला मांसाहार खूप आवडत होता. पण जेव्हा मला हे समजले की यासाठी मुक्या प्राण्यांना किती वेदना सहन कराव्या लागतात, तेव्हापासून मी मांसाहार सोडून दिला. रोहिणी वीरायथन म्हणाले, की बायबलमध्ये असे लिहिले आहे, की माणसाला जेव्हा जन्म दिला, तेव्हा फक्त धान्य, फळ व बी दिले होते. माणसाने पाप करायचा निश्चय केला व त्याने मांस खाणे सुरू केले. मांसाहाराने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. इस्कॉन संस्थेचे श्वेतदीपदास प्रभू म्हणाले, की पूर्ण जगामध्ये ६ कोटी लोकांना आम्ही शाकाहारी बनविले. चांगल्या चरित्रासाठी शाकाहार आवश्यक आहे. आमच्यासाठी जेवण हे जेवण नसून देवाचा प्रसाद आहे व आम्ही त्याला प्रसाद म्हणूनच ग्रहण करतो.