शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

मद्यसेवन परवाना आता आॅनलाईन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 11:17 AM

सोलापूर : उत्पादन शुल्क खात्याकडून मद्यपान करणाºयांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  मद्य पिण्यासाठी लागणारा परवाना आता आॅनलाईन झाला असून, मद्यविक्रीसह १३ प्रकारच्या विविध सेवा आता अर्ज करणाºयांना घरबसल्या मिळणार आहेत.

ठळक मुद्दे १३ प्रकारच्या विविध सेवा आता घरबसल्या मिळणार परवाने तातडीने उपलब्ध होणारसर्वच खात्यांमध्ये ‘स्मार्ट वर्क’ करण्यासाठी स्पर्धा

महेश कुलकर्णी : आॅनलाइन लोकमतसोलापूर : उत्पादन शुल्क खात्याकडून मद्यपान करणाºयांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  मद्य पिण्यासाठी लागणारा परवाना आता आॅनलाईन झाला असून, मद्यविक्रीसह १३ प्रकारच्या विविध सेवा आता अर्ज करणाºयांना घरबसल्या मिळणार आहेत.प्रशासनाच्या सर्वच खात्यांमध्ये ‘स्मार्ट वर्क’ करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असून, फारसे प्रसिद्धीच्या झोतात नसणारे राज्य उत्पादन शुल्क खातेही या स्पर्धेत मागे राहिलेले नाही. १ आॅगस्टपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील उत्पादन शुल्क खात्याने मद्यपान आणि मद्यविक्रीच्या परवान्यासह १३ आॅनलाईन सेवांना सुरुवात केलेली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह राज्यात मद्यपान करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी परवाना लागत असतो. असे परवाने एक दिवसापासून, वार्षिक आणि आजीवन या तीन प्रकारात उपलब्ध असतात. उत्पादन शुल्क खाते आणि मद्यविक्रीच्या दुकानात हे परवाने उपलब्ध असतात. विशेषत: ३१ डिसेंबरला या परवान्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. असा परवाना मिळविण्यासाठी इच्छुकांना उत्पादन शुल्क खात्यात चकरा मारण्याची गरज राहिली नाही.यासाठी आॅनलाईन अर्ज करता येणार नाही. ठराविक शुल्काची रक्कम आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास हे परवाने तातडीने उपलब्ध होणार आहेत. याबरोबरच उत्पादन शुल्क खात्याकडे परवानगीसाठी येणारे वाईन शॉप (एफएल-२), परमिट रुम (एफएल-३), देशी दारू (सीएल-३), बीअर शॉपी (एफएल/बीआर-२) या महत्त्वाच्या परवान्यांसाठी आता उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. मुंबईस्थित महाआॅनलाईन लि. या कंपनीद्वारे ही राज्यभरातील सर्व जिल्ह्यात ही सेवा पुरविण्यात येणार असून ६६६.ी७ू्र२ी२ी१५्रूी२.ेंँंङ्मल्ल’्रल्ली.ॅङ्म५.्रल्ल  या वेबसाईटवर ही सर्व माहिती भरता येणार आहे.------------------------------प्रशिक्षण पूर्णजिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आॅनलाईन अर्ज यासंबंधीचे प्रशिक्षण मुंबई येथील महाआॅनलाईनचे शशिकांत इगवले यांनी दिले. या प्रशिक्षणात उत्पादन शुल्क खात्याकडून दिल्या जाणाºया सेवांचे अर्ज कसे भरावेत तसेच ते कसे स्वीकारावेत यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी, कर्मचारी आणि मद्यविक्रेते उपस्थित होते.---------------------एक आॅगस्टपासून राज्यभरात आॅनलाईन अर्ज भरण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शासनाचा महसूल वाढणार असून इच्छुकांना कार्यालयात न येता १३ प्रकारच्या सेवा मिळणार आहेत.- रवींद्र आवळे,अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर----------------------------मद्यसेवन परवाना- एक दिवस - लगेच- वार्षिक - एक आठवडा- आजीवन - एक आठवडा