विलास गावंडे , यवतमाळएसटी महामंडळाने बचत तसेच कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्याबळावर उपाय म्हणून चालकानेच वाहकाची भूमिका पार पाडावी, असा आदेश काढला आहे. त्यामुळे आता चालकाला दुहेरी भूमिका पार पाडावी लागणार आहे. वाहक नसल्याने बसफेरी गेली नाही, ही अधिकाऱ्यांची ओरडही त्यामुळे कमी होणार आहे. चालकाला प्रशिक्षण काळात वाहकाचे प्रशिक्षण देण्यात येते. अनेकदा वाहक नाही म्हणून फेऱ्या रद्द केल्या जातात. महामंडळाचे आर्थिक नुकसान होते. मोटार वाहन कायदा १९८८मध्ये चालक-वाहकांचे कर्तव्य देण्यात आले आहेत.
चालक आता वाहकाच्या भूमिकेत
By admin | Published: October 06, 2016 5:30 AM