ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. ३ - मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल वाहून गेला असून त्यावरील दोन बस तसेच १२-१५ वाहनेही वाहून गेली आहेत. दरम्यान त्या दोन बसपैकी एमएच ४० एन-१७३९ क्रमांकाच्या राजापूर-बोरिवली एसटी बसचा चालक परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील अंरवेली येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.
अंतरवेली येथील गोरखनाथ सिताराम मुंडे हे तीन ते चार वर्षापूर्वी रायगड आगारात चालक म्हणून नोकरीला लागले होते. चिपळूण आगारात त्यांची नियुक्ती असून, चिपळून येथेच ते कुटूंबियासह राहत असल्याची माहिती अंतरवेली येथील त्यांच्या नातेवाईकांनी दिली़.