५० जणांचे पथक शोधात : आतापर्यंत तिघांना केले ठारविवेक चांदूरकरबुलडाणा, दि. ९ : ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमध्ये हल्ला करून तिघांना ठार करणाऱ्या अस्वलाचा शोध सध्या वनविभागाच्यावतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. याकरिता राज्यातील प्राविण्यप्राप्त डॉग स्कॉड बोलाविण्यात आले असून,ड्रोणचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही अस्वल या पथकाच्या निदर्शनास पडले नाही. तीन जण अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाल्याने एकीकडे नागरिकांचा दबाव वाढत आहे तर दुसरीकडे अस्वल निदर्शनास येत नाही आहे. डोंगर खंडाळा गावाजवळ अस्वलाने एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना गुरूवारी घडली. यासह चिखली तालुक्यातील डोंगरशेवली गावातही अस्वलानेहल्ला करून एका शेतकऱ्याला ठार केले. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारयांनी अस्वलाला ठार करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानंतर वनविभागाच्या चमुने अस्वलाचा शोध घेतला. मात्र त्यांना अस्वल निदर्शनास पडले नाही. त्यानंतर पुन्हा अस्वलाने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केल्याने आता बुलडाणा, अमरावती व अकोला येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या अस्वलाचा शोध घेत आहेत. याकरिता वनविभागाकडे असलेल्या प्राविण्यप्राप्त डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले आहे. स्कॉडमधील कुत्र्याने अस्वलाचा माग घेतला असून, कोणत्या दिशेने अस्वल आल्याचे दाखविले. गत तीन दिवसांपासून आता जवळपास ५० जणांची चमू या अस्वलाचा शोध घेत आहे.