ठाणे : मराठवाड्यातील दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांसाठी वागळे इस्टेट भागात एक मोठी छावणी उभारून त्यांच्या राहण्याची सोय केल्यानंतर आता त्यांना स्वकमाईतून चार पैसे गाठीशी बांधण्याची संधीही देण्यात आली आहे. यात पुरुषांना ४०० रुपये, तर महिलांना ३०० रुपये रोजंदारीने काम दिले आहे.रोजंदारीवर कष्ट करून चार पैसे कमवावेत, अशी इच्छा या स्थलांतरितांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार, त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बिल्डर्स असोसिएशन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि मनपाचे कंत्राटदार यांच्यामार्फत हा रोजगार देण्यात आला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालये, बाराबंगला, मनोरुग्णालय, न्यायालय, विश्रामगृह या ठिकाणी या दुष्काळग्रस्तांची पथके तयार करून त्यांना बुधवारपासून काम देण्यात आले आहे. परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, इमारतींची निगा राखणे अशा स्वरूपाची कामे दिली आहेत. मजुरी म्हणून पुरुषांना ४०० रु पये आणि महिलांना ३०० रुपये दराने दैनंदिन रोजगार दिला जात आहे. (प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्तांना मिळाला रोजगार
By admin | Published: April 21, 2016 4:59 AM