संजय तिपाले, बीडटंचाई निवारणासाठी हातपंप, कूपनलिका, विहिरी आदी कामे प्रस्तावित असताना जिल्ह्यात भूवैज्ञानिकांची अर्धा डझन पदे रिक्त आहेत. मराठवाड्यात अशी ३२ पदे रिक्त असल्यामुळे बहुतांश ठिकाणी भूजल सर्वेक्षण ‘अंदाजे’ होऊन कोट्यवधींचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता वाढली आहे.भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग या कार्यालयांमध्ये भूवैज्ञानिकांची पदे रिक्त आहेत. यंदा २,९१४ हातपंपांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. हातपंप घेण्यापूर्वी भूवैज्ञानिकांनी स्थळपाहणी करून भूगर्भातील पाण्याची स्थिती नोंदवायची असते. जेथे पाणीपातळी खालावली आहे व बोअर ‘फेल’ जाण्याची शक्यता आहे, असे प्रस्ताव फेटाळण्याचे अधिकार भूवैज्ञानिकांना असतात; परंतु पाणी सर्वेक्षणासाठी भूवैज्ञानिक उपलब्ध नाहीत.
भूवैज्ञानिकांचा ‘दुष्काळ’!
By admin | Published: January 22, 2016 3:37 AM