शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

‘दुष्काळी’ गावांवर ‘सुलतानी’ संकट !

By admin | Published: January 13, 2016 4:26 AM

अंतिम पैसेवारीनंतर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झालेल्या राज्यातील १२ हजार वाढीव गावांना मदत देण्यास ‘एनडीआरएफ’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) नकार दिला आहे.

- राजेश निस्ताने,  यवतमाळ

अंतिम पैसेवारीनंतर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झालेल्या राज्यातील १२ हजार वाढीव गावांना मदत देण्यास ‘एनडीआरएफ’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) नकार दिला आहे. त्यामुळे या गावांच्या आर्थिक मदतीची व्यवस्था करायची कोठून, असा पेच युती सरकारपुढे निर्माण झाला आहे. खरीप हंगाम बुडाल्याने राज्य सरकारने १५ हजार ७४७ गावांसाठी ३ हजार ५७८ कोटींच्या दुष्काळी मदतीची मागणी केंद्राकडे नोंदविली होती. यातील २ हजार कोटींचा पहिला टप्पा प्राप्त झाला. सर्वत्र दुष्काळी स्थिती असताना २० आॅक्टोबरच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार निवडकच गावांना मदत दिली गेली. वास्तविक, अंतिम पैसेवारीनंतर दुष्काळग्रस्त गावांची संख्या तब्बल १२ हजारांनी वाढून २७ हजारांवर पोहोचली. या गावांची पीक पैसेवारी ५० पैशाच्या आत निघाली. पर्यायाने ही गावेही दुष्काळी मदतीसाठी पात्र ठरली आहेत.‘एनडीआरएफ’ला पैसेवारी अमान्यकेंद्र शासनाच्या ‘एनडीआरएफ’ने आता उर्वरित वाढीव १२ हजार गावांबाबत हात वर केले आहेत. पहिल्यांदा ५० टक्क्यापेक्षा कमी पीक पैसेवारी निघालेली गावेच एनडीआरएफला मान्य आहेत. नंतर समाविष्ट गावे ही प्रशासनावर राजकीय दबाव आणून दुष्काळ दाखविण्याचा प्रयत्न असल्याचा त्यांना संशय आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनातील महसूल, पुनर्वसन सचिवांनीही ‘एनडीआरएफ’च्या सुरात सूर मिसळला असल्याचे समजते.वैदर्भीय शेतकऱ्यांना फटकाएनडीआरएफ व सचिवांची दुष्काळी मदतीच्या मुद्द्यावर ‘एकजूट’ पाहता १२ हजार गावांमधील लाखो शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे आहेत.मदतीसाठी ‘एसडीआरएफ’चा पर्यायराज्याच्या तिजोरीतून, अर्थात एसडीआरएफमधून (राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) निधीची तरतूद करणे अथवा एनडीआरएफ आणि केंद्र शासनाला १२ हजार गावे दुष्काळी यादीत का वाढली हे पटवून देणे हेच पर्याय युती शासनापुढे दिसत आहेत.कापूस उत्पादकांना वगळले‘एनडीआरएफ’ने विदर्भात ७५ टक्क्यांवर पर्जन्यवृष्टीचे कारण पुढे करून दुष्काळी मदतीच्या पहिल्या टप्प्यातून कापूस उत्पादकांनाच वगळले.महसूलमंत्र्यांच्या क्षेत्रात अधिक निधीराज्याचे महसूल व मदत-पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी आपले प्रभाव क्षेत्र असलेल्या बुलडाणा व जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी मदतनिधी खेचून नेला. बुलडाण्याचे ते पालकमंत्री असल्याने तेथे पहिल्याच टप्प्यात १८३ कोटी ८३ लाख तर जळगाव या गृह जिल्ह्यात १०५.२७ कोटींचा निधी नेला.आणेवारीत नव्याने समाविष्ट गावांना दुष्काळी मदत देण्यास ‘एनडीआरएफ’ने नकार दिला आहे. सचिवस्तरीय अधिकारीही तीच भाषा बोलू लागले आहेत. यासंदर्भात १४ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे. त्यात ठोस काही तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. - संजय राठोड, महसूल राज्यमंत्री