जळगाव : पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात भीषण स्थिती असून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री व शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी पत्र परिषदेत केली. मागणीची दखल न घेतल्यास शिवसेना रस्त्यावरही उतरेल, असा निर्धार पदाधिकाºयांनी व्यक्त केला.शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार आर. ओ. पाटील, माजी आमदार कैलास पाटील आदींची उपस्थिती होती.सुरेशदादा म्हणाले की, दुष्काळ जाहीर झाला पाहिजे यासह महागाई कमी करावी आदी मागण्या असून त्याबाबतचे निवेदन जिल्ह्याधिकाºयांना देण्यात येत आहे.शिवसेनेतून काही आमदार बाहेर पडू शकतात. अशा बातम्या येत आहेत. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सर्व मंत्री आणि आमदारांचा विश्वास असून सेनेतून कोणीही बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही, असेही सुरेशदादा जैन यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा - सुरेशदादा जैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 5:25 AM