शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

पश्चिम विदर्भातील सात लाख हेक्टर क्षेत्राला दुष्काळी मदत, २८ तालुक्यांत दुष्काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 5:57 PM

यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला एनडीआरएफची ४७४ कोटी ३६ लाख रूपयांची मदत मिळणार आहे.

 - गजानन मोहोड  अमरावती - यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला एनडीआरएफची ४७४ कोटी ३६ लाख रूपयांची मदत मिळणार आहे. दोन टप्प्यात मिळणा-या या मदतनिधीच्या पहिल्या टप्प्यातील २३७ कोटी १८ लाखांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे.दुष्काळ व्यवस्तापन संहिता-२०१६च्या निकषानुसार विभागातील २८ तालुक्यांत दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागल्याने शासनाने ३१ आॅक्टोबर २०१८ ला २८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता व त्याच तालुक्यांना २५ जानेवारीला दुष्काळनिधीची मदत जाहीर केली. या २८ तालुक्यांत पीककापणी प्रयोगानंतर कृषी विभागाद्वारा सत्यापन करण्यात आले होते. त्यानुसार या सर्व तालुक्यात ६,७२,६६३ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने केंद्रीय आपदा निधीमधून आता मदत देण्यात येणार आहे. सत्यापनानुसार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात ४२,९८८ हेक्टर, चिखलदरा २२,९७६, मोर्शी ५८८४९, वरूड ४९४१४, अंजनगाव सुर्जी ४१६९५ अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात ४७३१, अकोला ३६४, तेल्हारा ५४५९, बाळापूर ६२९६, बार्सी टाकळी २३११ यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ तालुक्यात ६२.२९, बाबूळगाव ५९.९९, कळंब ८६.८६, राळेगाव ७८.८९, मारेगाव ९१.७७, केळापूर १३८.२३, दारव्हा ६४.७७, महागाव ७५.२२ व उमरखेड तालुक्यात ८०.४ हेक्टर बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात ५८७१४ हेक्टर, मलकापूर ४२३५७, खामगाव ७५३७०, शेगाव ४६७५३, नांदुरा ५०१०४, संग्रामपूर ४२७१४, लोणार ५२४२४ व सिंदखेडराजा ६४१०१ तसेच वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात ४३०३.१९ हेक्टरसाठी ही मदत राहणार आहे.

 कमी पैसेवारीच्या ४७९१ गावांना दुष्काळनिधीत डावलले दुष्काळाच्या नव्या संहितेनुसार शासनाने ३१ ऑक्टोबरला विभागातील २८ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. यामध्ये २००७ गावांत दुष्काळ स्थिती शासनाने जाहीर केली व आता एनडीआरएफचा मदतनिधीदेखील मिळणार आहे. मात्र, ३१ डिसेंबरला खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर केली. यामध्ये दुष्काळी गावे वगळता ४७९१ गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी आहे. मात्र, या गावांना मदतनिधी मिळणार नसल्याने कमी पैसरवारीच्या सर्व गावांना समान न्याय नसल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.

टॅग्स :droughtदुष्काळVidarbhaविदर्भ