शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

राज्यातील दुष्काळाचे चित्र गंभीर; ८.३२ लाख जनावरे चारा छावण्यांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 3:31 AM

४ हजार ७७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील आकडेवारी

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असून तब्बल ८ लाख ३२ हजार जनावरे १ हजार २६४ चारा छावण्यांमध्ये दाखल झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचे संकट गहिरे बनले असून आताच ४ हजार ७७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि त्यानंतर दुष्काळ निवारणासंदर्भात असलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दुष्काळाची दाहकता अधोरेखित करणारी आकडेवारी गुरुवारी मांडण्यात आली. राज्यातील ३ हजार ६९९ गावे आणि ८ हजार ४१७ वाड्यांवर सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी ९३७ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. यंदा त्यात आतापर्यंत ३ हजार ८३७ टँकरची वाढ झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ४७१ छावण्या सुरू आहेत. पुणे विभागात सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात १११, औरंगाबाद विभागात औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात ६८२ छावण्या सुरू आहेत. चारा छावण्यांमधील मोठ्या जनावरांसाठी ९० रुपये तर छोट्या जनावरांसाठी प्रत्येकी ४५ रुपये अनुदान दिले जात आहे. वीज थकबाकी न भरल्याने बंद करण्यात आलेल्या ३ हजार ३२० पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट देण्यात आली. ही सवलत एकूण ६७३ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात ३४ हजार ४३१ कामे सुरू आहेत. त्यावर २ लाख ७४ हजार मजूर काम करीत आहेत.विम्याची रक्कम आठ दिवसांतराज्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेचे वाटप येत्या आठ दिवसात सुरू करण्यात येईल. त्या पोटी ३ हजार २०० कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांना मदतीसाठी केंद्र सरकारने ४ हजार ५६२ कोटी रुपयांची मदत राज्याला दिली आहे. राज्यातील ६७ लाख ३० हजार ८६५ शेतकºयांना आतापर्यंत ४ हजार ४१२ कोटी रुपये मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdroughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस