ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ७ - राज्यात दुष्काळाचं सावट येणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील पत्रकार परिषदेत वर्तविले आहे.
राज्यातील आणि केंद्रातील सरकार बदलले असून या सरकारने शेतक-यांच्या अपेक्षा भंग केला आहेत. आमचे सरकार असताना नेहमीच शेतक-यांना पाठिशी होते आणि त्यांना मदत करत आले आहे. याचबरोवर ऊस उत्पादकांना योग्य असा भाव देण्याचे काम केले असल्याचे यावेळी शरद पवार सांगितले.
साखरेला अनुदान देण्याची जबाबदारी सरकारची असून याबाबत कोणतेही निर्णय घेतले जात नसून उसाला एफआरपीनुसार दर दिला जात नाही. याला काहीप्रमाणात कोल्हापूर जिल्हाच जबाबदार असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच, केंद्र सरकारने साखरेचे पडलेले भाव लक्षात घेऊन आर्थिक मदत जाहीर केली, मात्र ही मदत ऊस उत्पादकांना नसून ती साखर कारखान्याना केली असल्याचेही ते म्हणाले.